अमरावती शहराची लोकसंख्या दहा लाख; 'ट्रॅफिक सिग्नल' केवळ पाच !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 12:50 PM2024-07-15T12:50:14+5:302024-07-15T12:51:30+5:30

Amravati : महानगरात प्रमुख ४० चौक; वाहतुकीची वाताहत, नव्याने २५ चौकात सिग्नलची गरज

Amravati city has a population of one million; 'Traffic signal' only five! | अमरावती शहराची लोकसंख्या दहा लाख; 'ट्रॅफिक सिग्नल' केवळ पाच !

Amravati city has a population of one million; 'Traffic signal' only five!

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठे शहर आणि विभागस्तरावर नावलौकिक असलेल्या महानगराची वाहतूक कोंडीमुळे वाट लागली आहे. महानगराची सुमारे दहा लाख लोकसंख्या असताना वाहतूक नियंत्रण करणारे केवळ पाचच 'ट्रॅफिक सिग्नल' सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे नव्याने २५ चौकात सिग्नलची गरज भासू लागली आहे.

विदर्भात नागपूर आणि अमरावती हे प्रादेशिक जिल्हे असून, विभागाची प्रमुख शहरे मानली जातात. नागपूर शहराने विकासाची कात टाकली आहे. वाहतूक आणि रस्ते नियोजनात नागपूर आघाडीवर आहे. मात्र, विकासात्मकदृष्ट्या अमरावती शहर प्रचंड माघारले आहे. एक मॉडेल स्टेशन वगळता औद्यागिक, शैक्षणिक आणि दळणवळणाच्या बाबतीत अमरावतीची वाट लागली आहे. अमरावतीत विकासाच्या नियोजनाचा अभाव हे महत्त्वाचे कारण दिसून येते.


शहराची वाहतूक म्हणजे सर्कस
शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे आयुक्तालय निर्माण करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना बळ मिळाले. मात्र, येथील अंतर्गत वाहतूक ही वाहनधारकांसाठी सर्कस ठरली आहे. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने ऑटोरिक्षांची संख्या विदर्भात प्रथम क्रमांकाची आहे. एका प्रवाशाकरिता अनेक ऑटोरिक्षा उभे येऊन ठाकतात. महत्त्वाच्या चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे.


पाच 'ट्रॅफिक सिग्नल' सुरू
शहरात किमान ४० चौक आहेत. या सर्व चौकांमध्ये सकाळ, सायंकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. वाहतूक नियंत्रणासाठी किमान २८ चौकात 'ट्रॅफिक सिग्नल' आवश्यक आहेत. असे असले तरी पंचवटी चौक, ईर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, राजकमल चौक, शेगाव नाका या पाच ठिकाणी 'ट्रॅफिक सिग्नल' आहेत.


या चौकात हवे नवीन 'ट्रॅफिक सिग्नल'
अमरावती महानगरात वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला काही ठिकाणी नवीन 'ट्रॅफिक सिग्नल' निर्माण करणे गरजेचे आहे. यात गांधी चौक, जवाहर गेट, ईतवारा बाजार, नवाथे चौक, सरोज चौक, जयस्तंभ चौक, गोपालनगर डी मार्ट चौक, यशोदानगर, दस्तुरनगर, मोतीनगर चौक, मध्यवर्ती बसस्थानक, अमरावती रेल्वे स्थानक चौक, कॉटन मार्केट चौक, वडाळी ऑक्सिजन पार्क, सुंदरलाल चौक, चपराशी पुरा, रहाटगाव रिंग रोड, नवसारी रिंग रोड, कठोरा नाका ट्रॅव्हल्स पॉईंट, विदर्भ महाविद्यालय, कॅम्प चौक, विलासनगर, राजापेठ, चांदणी चौक, फरशी स्टॉप यासह बडनेरा जुनी वस्ती तसेच अकोला- यवतमाळ मार्गावर टी पॉईंट या ठिकाणी स्वयंचलित ट्रॅफिक सिग्नल लावणे काळाची गरज झाली आहे.


या चौकात बंद आहेत सिग्नल 
• बस स्थानक 
• रुक्मिणीनगर 
• जिल्हाधिकारी कार्यालय चौक 
• रहाटगाव रिंग रोड बियाणी चौक 
• चपराशीपुरा चोंक


शहरातील अनेक महत्वपुर्ण ठिकाणी वाहतूक नियमनासाठी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. काही ठिकाणी ब्लिकर्स लावण्यात आली आहेत. शाळांसह काही ठिकाणी सिग्नल नसले तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात असतात.
- संजय अढाऊ, वाहतूक पोलिस निरिक्षक

 

Web Title: Amravati city has a population of one million; 'Traffic signal' only five!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.