अमरावतीत गर्दी; तालुक्यात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 01:05 AM2019-08-21T01:05:27+5:302019-08-21T01:06:04+5:30

असंघटित कामगारांमध्ये मोडणाऱ्या बांधकाम तसेच रोजगार हमी योजनेवरील कष्टकऱ्यांची कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करून घेण्यासाठी अमरावती येथे प्रचंड गर्दी होत आहे. ही नोंदणी तालुका स्तरावर करण्याचीदेखील तरतूद शासनाने २ जानेवारी २०१८ रोजी यासंबंधी काढलेल्या पत्रात केली असून, त्यासाठी नोंदणी अधिकारी म्हणून विभागवार अधिकार देण्यात आले आहेत.

Amravati crowd; Fine in the taluka | अमरावतीत गर्दी; तालुक्यात ठणठणाट

अमरावतीत गर्दी; तालुक्यात ठणठणाट

Next
ठळक मुद्देकामगार नोंदणी : आदेशाची अंमलबजावणी होणार केव्हा?

कलोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : असंघटित कामगारांमध्ये मोडणाऱ्या बांधकाम तसेच रोजगार हमी योजनेवरील कष्टकऱ्यांची कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करून घेण्यासाठी अमरावती येथे प्रचंड गर्दी होत आहे. ही नोंदणी तालुका स्तरावर करण्याचीदेखील तरतूद शासनाने २ जानेवारी २०१८ रोजी यासंबंधी काढलेल्या पत्रात केली असून, त्यासाठी नोंदणी अधिकारी म्हणून विभागवार अधिकार देण्यात आले आहेत. तथापि, त्याची माहिती उपलब्ध केलेली नाही. यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपºयातून मजुरांना अमरावतीत येऊन आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
लेहगाव (ता. मोर्शी) येथील अनोंदणीकृत जनक्रांती कामगार युनियन चालविणारे संदीप श्रीधर सवळे यांनी कामगार आयुक्त तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कामगार नोंदणीतील त्रुटी दूर करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. कामगार मंडळाचे पुस्तक (कार्ड) नवीन वा नूतनीकरणासाठी ठेकेदाराचे प्रमाणपत्र जो बांधकाम मजूर आहे, त्यांच्यासाठीच लागू करावे. रोजगार हमी योजनेत मजूर असलेल्यांना स्थानिक रोजगार सेवक व ग्रामसचिव यांच्या स्वाक्षरीने ९० दिवसांहून अधिक मजुरी केल्याचे प्रमाणपत्र स्वीकारले जावे. शासननिर्णय १३ आॅक्टोबर २०१७ च्या पत्रानुसार कामगार मंडळाचे कार्ड (पुस्तक) नवीन/नूतनीकरण हे तालुका स्तरावर गटविकास अधिकाºयांमार्फत करावे, अशा मागण्या त्यांनी मांडल्या.
तहसील स्तरावर नोंदणी शून्य
कामगार महामंडळाकडून होणारी नोंदणी ही तालुकास्तरावर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यासाठी नोंदणी अधिकारी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. कामगार कल्याण मंडळात सहायक कल्याण आयुक्त, कामगार विकास अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी यांच्यासह तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, महानगरपालिकेचे वॉर्ड आॅफिसर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, जलसंधारण विभागाचे उपअभियंता, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कामगार विभागात कामगार आयुक्त (राज्य), अप्पर कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त, सहायक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, कामगार अन्वेषक, दुकाने निरीक्षक यांचा यामध्ये समावेश आहे.
इतर कामांची नोंद का नाही?
रोहयो अंतर्गत बांधकामाव्यतिरिक्त रस्त्याचे खडीकरण, नर्सरी, कालवा खोलीकरण, नाला खोलीकरण आदी इतर कामेदेखील होतात. ती सर्वच कामे कंत्राटदाराकडून होत नाहीत. त्यामुळे अशा कामांवरील कामगारांना कामगार मंडळाचे कार्ड (पुस्तक) नवीन/नूतनीकरणासाठी लागणारे प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे असे कामगार नोंदणीपासून वंचित राहणार आहेत.

Web Title: Amravati crowd; Fine in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.