अमरावती जिल्ह्यात नोकरी जाण्याच्या भीतीने कामगाराने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 03:15 PM2021-08-04T15:15:50+5:302021-08-04T15:16:47+5:30

Amravati News नांदगाव पेठ एमआयडीसीतील एका कंपनीने करार संपल्याने महिनाभर मुदतीची नोटीस कार्यालयाच्या भिंतीवर चिटकविली. आता आपली नोकरी जाणार, या भीतीपोटी एका कामगाराने राहत्या घरात मंगळवारी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

In Amravati district, a worker ended his life journey for fear of losing his job | अमरावती जिल्ह्यात नोकरी जाण्याच्या भीतीने कामगाराने संपविली जीवनयात्रा

अमरावती जिल्ह्यात नोकरी जाण्याच्या भीतीने कामगाराने संपविली जीवनयात्रा

Next
ठळक मुद्देराहत्या घरात घेतला गळफास, माहुली जहागीर येथील घटना

 लोकमत न्यूज नेटवर्क  

अमरावती : नांदगाव पेठ एमआयडीसीतील एका कंपनीने करार संपल्याने महिनाभर मुदतीची नोटीस कार्यालयाच्या भिंतीवर चिटकविली. आता आपली नोकरी जाणार, या भीतीपोटी एका कामगाराने राहत्या घरात मंगळवारी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. शरद श्रीरामजी काळकर (४२) असे त्या कामगाराचे नाव आहे. तो माहुली जहागीर येथील रहिवासी आहे.

कंपनीने दोन दिवसांपूर्वी कार्यालयाच्या भिंतीवर नोटीस चिकटवली आणि ३१ ऑगस्टपर्यंत कामगारांना मुदत देत त्यानंतर कामगारांनी आपापली व्यवस्था इतर ठिकाणी करण्याचे सुचविले आहे. घटनास्थळी नातेवाईक व कामगारांनी एकच आक्रोश होता. पॉवर मॅक कंपनीच्या व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी यावेळी नातेवाइकांनी केली. सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत शरदच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.

Web Title: In Amravati district, a worker ended his life journey for fear of losing his job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू