अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती; महाआघाडीचे धीरज लिंगडे 3382 मतांनी विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 02:06 PM2023-02-03T14:06:00+5:302023-02-03T14:10:10+5:30

सर्वाधिक मते असणाऱ्या धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करण्याची औपचारिकता बाकी आहे.

Amravati Division Graduate Constituency Result Out; Maharashtra Vikas Aghadi Dhiraj Lingde won by 3382 votes | अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती; महाआघाडीचे धीरज लिंगडे 3382 मतांनी विजयी

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती; महाआघाडीचे धीरज लिंगडे 3382 मतांनी विजयी

googlenewsNext

- गजानन मोहोळ                          

अमरावती: 21 उमेदवार बाद झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक 47101 मतांचा कोटा एकही उमेदवार पूर्ण करू शकले नाहीत. यापासून महा आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे 757 मतांनी दूर आहेत. अंतिम दोन उमेदवार असल्याने यापैकी सर्वाधिक मते धीरज लिंगाडे 46344 व भाजपचे रणजीत पाटील यांना 42962 मते मिळाली.

या दोन्ही उमेदवारापैकी सर्वाधिक मते असणाऱ्या धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करण्याची औपचारिकता बाकी आहे. या दोन्ही उमेदवारांची नावे व मते निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी भारत निवडणूक आयोगाकडे कळविली आहेत आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर धीरज लिंगडे हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 30 जानेवारीला 1,02,403 मतदान झाले. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे चार व अपक्ष 19 असे एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी येथील नेमाणी गोडावूनमध्ये मतमोजणीला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली होती. ती आज दूपारपर्यंत सुरु होती.

Web Title: Amravati Division Graduate Constituency Result Out; Maharashtra Vikas Aghadi Dhiraj Lingde won by 3382 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.