अमरावती विभागात आजपासून बारावीची परीक्षा, १ लाख ५२ हजार परीक्षार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 04:35 PM2018-02-20T16:35:03+5:302018-02-20T16:35:45+5:30
अमरावती - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बुधवार २१ फेब्रुवारीपासून होत आहे. पहिला पेपर सकाळी ११ ते २ वाजपर्यंत राहील. यंदा विभागातील १ लाख ५३ हजार ५०४ विद्यार्थी विविध ४७७ केंद्रांवरून बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाने तयारी पूर्ण केली आहे.
विभागातील पाच जिल्ह्यांत इयत्ता बारावीची परीक्षा देणाºयांमध्ये अमरावती जिल्ह्यातील ३९ हजार ८३, अकोला २७ हजार २५५, बुलडाणा ३३ हजार २७१, यवतमाळ ३४ हजार ११४, वाशिम १८ हजार ७८१ असे एकूण १ लाख ५२ हजार परीक्षार्थी आहेत. परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी ८ भरारी पथके राहणार आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतरचे शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी, महिला पथक, याप्रमाणे प्रत्येकी एक, तर शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे दोन पथक राहणार आहेत.
परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी
परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी आहे. यासह केंद्रावरील सर्व पर्यवेक्षकांनाही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी आपले मोबाईल केंद्र संचालकांकडे जमा करायचे आहेत, गरज पडल्यास केंद्र संचालकांना संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी सूचना
परीक्षार्थ्यांनी १०.३० वाजता परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे, दुपारी पेपर असल्यास अर्धातास अगोदर यावे, असे आवाहन केंद्र संचालकांनी केले आहे.
नियोजनबद्ध बैठक व्यवस्था
परीक्षा हॉलमध्ये केवळ २५ विद्यार्थी एका दालनात राहतील. याच दालनात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रश्न व उत्तरपत्रिका उघडल्या जातील. उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात येईल.