अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत १५.९४ टक्के मतदान

By गणेश वासनिक | Published: January 30, 2023 01:36 PM2023-01-30T13:36:51+5:302023-01-30T13:37:33+5:30

मतदानाला सोमवारी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात

Amravati division recorded 5.49 percent polling till 10 am | अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत १५.९४ टक्के मतदान

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत १५.९४ टक्के मतदान

googlenewsNext

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकींसाठी मतदानाला सोमवारी सकाळी ८  वाजेपासून सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये २६२ मतदान केंद्रावर सरासरी १५.९४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे. 

अमरावती जिल्ह्यात ७५ मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत १३.६९ टक्के मतदान झाले आहे. अकोला जिल्ह्यात ६१ मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत १४.६५ टक्के मतदान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५२ मतदान केंद्रावर दुपारी १२ जेपर्यंत १७.८९ 9 टक्के मतदान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत १८.०७ टक्के मतदान झाले आहे. तर वाशीम जिल्ह्यात २६ मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत १९.३९ टक्के मतदान झाले आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरु आहे.

Web Title: Amravati division recorded 5.49 percent polling till 10 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.