कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची अमरावतीतील शेतक-यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 08:03 PM2017-08-19T20:03:17+5:302017-08-19T20:03:26+5:30

यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाने दडी दिल्यामुळे शेतक-यांना पीकमोड करावी लागली. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. 

Amravati farmers' demand to announce dry drought | कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची अमरावतीतील शेतक-यांची मागणी

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची अमरावतीतील शेतक-यांची मागणी

Next

वीरेंद्रकुमार जोगी/ अमरावती, दि. 19  : यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाने दडी दिल्यामुळे शेतक-यांना पीकमोड करावी लागली. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत अमरावती जिल्ह्यात ८१४ मिमी पाऊस अंदाजित आहे. ऑगस्ट महिन्यात २० तारखेपर्यंत ५५७ मिमी पाऊस व्हावा, असा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात १९ आॅगस्टपर्यंत ३२४.२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३९.८ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीपर्यंत ७३८ मिमी पाऊस झाला होता. 
पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे अनेक तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अचलपूर उपविभागातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा व धारणी तालुक्यात यंदा पावसाने ४० टक्के देखील पाऊस झाला नाही. अचलपूर तालुक्यात ३१.२, दर्यापूर ३५.६, अंजनगाव २७.१, चिखलदरा ३७.५ व धारणी तालुक्यात केवळ ४०.१ टक्के पाऊस झाला आहे.  जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात झाला असून येथील सरासरी ५१.३ एवढी आहे. 
जिल्ह्याच्या पेरणीचा अंदाज घेतला तर अंजनगाव तालुक्यात अंदाजित पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ६७०० हेक्टर, अचलपूर ५४३१, चांदूर बाजार १२८४७, चांदूररेल्वे १६२२, तिवसा २८१८, मोर्शी ९३६२, वरुड २७७८, दर्यापूर १९८५, धारणी ४१५, चिखलदरा १९९४, भातकुली १३४२, नांदगाव खंडेश्वर, २१२० व अमरावती तालुक्यात १३४२ हेक्टर क्षेत्रात कमी पेरणी झाली आहे. धामणगाव तालुक्यात अंदाजित क्षेत्राच्या तुलनेत ४११ हेक्टरवर जादा पेरणी झाली आहे. 
दर्यापूर, अंजनगाव, भातकुली तालुक्यातील अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातील उभ्या पिकावर नांगर फिरविला आहे. धामणगाव, तिवसा, चांदूररेल्वे, मोर्शी, चांदूरबाजार तालुक्यातील पिके वाढली. मात्र पाऊस झाला नसल्याने रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यावर्षी उत्पादन निम्मे होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. 
 
शेतकरी पिकविम्यापासून वंचित 
पंतप्रधान पीकविमा योजनचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, यासाठी वाढ देण्यात आली होती. मात्र जाचक अटीमुळे अनेकांना पीकविमा काढता आला नाही. यामुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यतादेखील कमी आहे. 
 
जिल्ह्यातील पिकांची अवस्था पाहून जिल्हापरिषदेने दुष्काळ जाहीर करावा, असा ठराव घेतला असून तो शासनाकडे पाठविला आहे. जिल्हा परिषदेची कृषी समिती जिल्ह्यातील पिकांची माहिती घेत आहेत. राज्य शासनाने अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. - नितीन गोंडाने, अध्यक्ष, जिल्हा परिषद 
 
१० एकर जमिनीवर सोयाबीन पेरले; पण उगवण झाली नसल्याने त्यावर रोटावेटर फिरविले. तूर उगवली पण वाढ झाली नाही, मूग, उडीद व हायब्रिड ज्वारीलादेखील मोड आली आहे. खरीप झाला नाही. शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा. - दिलीप शेळके, शेतकरी, रासेगाव, अचलपूर 
 
यंदा आस्मानी व सुल्तानी संकट शेतकºयांवर ओढावले आहे. कमी पावसाचा फटका यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघेनासा झाला आहे. शासनाने शेतकºयांना मदत करावी. - धीरज दवे, शेतकरी, चांदूर बाजार

Web Title: Amravati farmers' demand to announce dry drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी