आज अमरावतीतील उड्डाणपूल बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:14 AM2020-12-31T04:14:44+5:302020-12-31T04:14:44+5:30
अमरावती : यंदा सरत्या वर्षाला गुडबाय व २०२१ चे स्वागत आपआपल्या घरी राहूनच करावे. कुणीही कायद्याचे उल्लंघन करू ...
अमरावती : यंदा सरत्या वर्षाला गुडबाय व २०२१ चे स्वागत आपआपल्या घरी राहूनच करावे. कुणीही कायद्याचे उल्लंघन करू नये, गुरुवारी रात्री १० नंतर आपत्कालीन वैद्यकीय सेवाव्यतिरिक्त कुणीही सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येऊ नये, अन्यथा कारवाईला समोरे जावे लागेल, असे निर्देश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले.
शहरातील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मुख्य चौकात एकूण ४१ फिक्स पाॅईंट निश्चित करण्यात आले असून, त्या ठिकाणी प्रत्येक वाहनाची कसून चौकशी होणार आहे. गत तीन दिवसांपासून रात्री मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. १२ ब्रेथ ॲनालायझर पोलिसांच्या दिमतीला राहणार आहेत. याशिवाय वाहनाचा वेग मोजण्याकरीता कार माऊंटेड स्पीड गन आहे. नागरिकांनी घरी राहूनच नववर्षाचे स्वागत करावे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
बॉक्स:
४१ फिक्स पॉईंट, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त
पोेलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात दोन्ही झोनचे डीसीपी, तीन एसीपी, १८ पोलीस अधिकारी तसेच एक हजार पोलीस कर्मचारी गुरुवारी रात्री रस्त्यावर तैनात राहणार आहेत. प्रत्येक फिक्स पाॅईंटवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात राहतील.
बॉक्स:
रात्री १० पर्यंतच हॉटेल, बार सुरू राहणार
‘थर्टी फर्स्ट’ला शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी, याकरिता शासनाच्या गाईडलाईनसुार हॉटेल, बार, रेस्टॉरेंट रात्री १० वाजतापर्यंतच सुरू राहतील. रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याचे निदर्शनास येताच आकस्मिक धाड टाकून गुन्हे नोंदविले जातील, असे सीपींनी बजावले. संंबंधित ठाणेदारांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.
बॉक्स:
रात्री ११ नंतर दोन्ही उड्डाणपुलावरील वाहतूक बंद
‘थर्टी फर्स्ट’ला युवक मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवितात. उड्डाणपुलावरून खाली कोसळण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्याअनुषंगाने गुरूवारी रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत गाडगेनगर ते क्रीडा संकुल तसेच इर्विन चौक ते राजापेठ या उड्डापुलावरून वाहतुकीस बंद घातल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्पष्ट केले.