Coronavirus in Amravati; अमरावतीमध्ये वडिलांसह चार महिन्याचे बालकही कोरोना संक्रमित; एकूण २४९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:43 AM2020-06-03T11:43:26+5:302020-06-03T11:44:55+5:30
अमरावती जिल्ह्यात दररोज नव्या भागात नोंद होत आहे. मंगळवारी १९ अहवाल पॉझिटिव्ह आले. यात चार महिने, दोन, पाच व दहा वर्षाच्या बालकांचाही समावेश आहे. दोन कुटुंबात आई-वडिलासह मुलगाही बाधित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात दररोज नव्या भागात नोंद होत आहे. मंगळवारी १९ अहवाल पॉझिटिव्ह आले. यात चार महिने, दोन, पाच व दहा वर्षाच्या बालकांचाही समावेश आहे. दोन कुटुंबात आई-वडिलासह मुलगाही बाधित झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता २४९ वर पोहोचली आहे.
अमरावती विद्यापीठाद्वारा प्राप्त अहवालानुसार मसानगंज परिसरात ४२ वर्षीय व्यक्ती, याच परिसरातील रतनगंज येथे ४२ व ५० वर्षाच्या व्यक्तीसह ७२ वर्षीय महिला, फ्रेजरपुरा कंटेनमेंटमध्ये चार महिन्याच्या चिमुरडीसह दोन, पाच व दहा वर्षीय बालक तसेच ३२, ३६, ४५ व ५७ वर्षीय पुरुष व २५ वर्षीय महिला, रामनगर येथे ३७ वर्षीय व बुधवारा येथे २३ वर्षीय तरूणाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त शहरातील चार नव्या भागात कोरोनाची एंट्री झालेली आहे. सातुर्णा परिसरातील मालू ले-आऊटमध्ये ३० वर्षीय महिला जलाराम नगरात ३७ वर्षीय पुरुष, छायानगरात ५० वर्षीय व यशोदानगरात ३५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २४९ झाली. यामध्ये १५ मृत, १२८ कोरोनामुक्त, व १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.