अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; १० जणांची माघार, २३ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:15 AM2023-01-17T11:15:27+5:302023-01-17T11:20:02+5:30

पाच जिल्ह्यांच्या या मतदार संघात ३० विधानसभा मतदार संघ तर ५६ तालुके असून प्रचारासाठी उमेदवारांना फक्त १२ दिवस

Amravati Graduate Constituency Election; 10 withdrawn, 23 candidates in fray | अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; १० जणांची माघार, २३ उमेदवार रिंगणात

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; १० जणांची माघार, २३ उमेदवार रिंगणात

Next

अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ३३ पैकी १० उमेदवारांनी माघार घेतली. आता २३ उमेदवार मैदानात आहेत.

विशेष म्हणजे, आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने जाहीर केलेल्या किरण चौधरी यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात भाजपचे डॉ. रणजित पाटील, काँग्रेसकडून धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकार, बहुजन भारत पार्टीचे डॉ. गौरव गवई हे राजकीय पक्षाचे चार उमेदवार असून उर्वरित १९ अपक्ष उमेदवार आहेत. पाच जिल्ह्यांच्या या मतदार संघात ३० विधानसभा मतदार संघ तर ५६ तालुके असून प्रचारासाठी उमेदवारांना फक्त १२ दिवस मिळणार असल्याने अक्षरश: पायाला भिंगरी लावून पदवीधरांपर्यंत पोहोचण्याची कसरत करावी लागणार आहे.

यावेळी ‘नोटा’ हा पर्याय नाही

सन २०२७ मधील ‘पदवीधर’मध्ये १३ उमेदवार व १४ व्या क्रमांकावर नोटा होते. त्यानंतर झालेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात नोटा (यापैकी कुणीच नाही) हा पर्याय नव्हता व भारत निवडणूक आयोगाचा आदेश त्यानंतर आदेश नसल्याने यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीत आता नोटा हा पर्याय राहणार नसल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

अमरावती व अकोला जिल्ह्यात ७४ तृतीयपंथी पदवीधर

पदवीधर मतदारसंघासाठी अमरावती व अकोला जिल्ह्यात ७४ तृतीयपंथी पदवीधर मतदारांनी नोंदणी केलेली आहे. उर्वरित यवतमाळ, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात तृतीयपंथी पदवीधरांची नोंदणी निरंक आहे. निवडणूक विभागाने या वेळेस किमान २.४० लाखांच्या दरम्यान मतदारसंख्या गृहित धरली होती. प्रत्यक्षात २१०५११ मतदार नोंदणी झाली. ही सन २०१७ च्या तुलनेत २४५८६ मतदारांनी कमी आहे.

Web Title: Amravati Graduate Constituency Election; 10 withdrawn, 23 candidates in fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.