Amravati: ग्रामपंचायत निवडणूक: मतदान केंद्रांच्या १०० मीटरमध्ये मोबाइल बंदी, रविवारी मतदान
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: November 4, 2023 06:33 PM2023-11-04T18:33:50+5:302023-11-04T18:34:26+5:30
Amravati: अमरावती जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व १७ मध्ये पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांच्या १०० मीटर आत मोबाइल बंदीसह अनेक निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत.
अमरावती : जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व १७ मध्ये पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांच्या १०० मीटर आत मोबाइल बंदीसह अनेक निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत.
मतमोजणी ६ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता होणार आहे. मतमोजणी ठिकाणी व मतमोजणी वेळी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी दक्षता घेण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये ६ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विवेक घोडके यांनी दिले केले आहेत. याशिवाय उमेदवार किंवा प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी स्थळाच्या १०० मीटर परिसराच्या आत प्रवेशास मनाई करण्यात आलेली आहे.
तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण
अमरावती तालुक्यात बचत भवन, भातकुली तालुक्यात निवडणूक शाखा, वरुड तालुक्यात नायब तहसीलदार महसूल यांचे दालन, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदुरबाजार तालुक्यातील तहसील कार्यालय, तर धारणी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृहात मतमोजणी होईल.