Amravati: ‘ईर्विन’ रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या ताब्यात, ५ एप्रिलपासून सीएस कार्यालयाच्या शिफ्टिंगला होणार सुरुवात
By उज्वल भालेकर | Published: March 21, 2024 09:43 PM2024-03-21T21:43:29+5:302024-03-21T21:43:44+5:30
Amravati News: अमरावती जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
- उज्वल भालेकर
अमरावती - जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे येथील सीएस कार्यालय हे याच रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे. ५ एप्रिलपासून या शिफ्टिंगलाही सुरुवात होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी फरिदाबाद येथील जागा निश्चित झाली असली, तरी या ठिकाणी महाविद्यालय आणि त्याला संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालयाची इमारत बांधकामाला लागणारा वेळ लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शहरातील इतर शासकीय रुग्णालयांच्या इमारतीमध्ये ७ वर्षांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय; तसेच आवश्यक इतर शासकीय रुग्णालयांची जागा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सात वर्षांच्या करारावर आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. तर काही दिवसांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी लागणाऱ्या पदनिर्मितीला देखील मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय होणार आहे.
त्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात होणाऱ्या बदलासाठी आवश्यक निधीही प्राप्त झाला आहे. त्यामुळे येथील सीएस कार्यालय हे रुग्णालयाच्या मागील बाजूस म्हणजेच गजानन महाराज मंदिराजवळ असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे. या ठिकाणी यापूर्वी केमोथेरेपी युनिट सुरू होते. ते विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे शिफ्ट झाले आहे. त्यामुळे खाली झालेल्या या इमारतीमध्ये ५ एप्रिलपासून सीएस कार्यालयाचे शिफ्टिंग सुरू होईल.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी रुग्णालयाची इमारत ७ वर्षांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये कराव्या लागणार आहेत. त्यामुळे सीएस कार्यालय हे गजानन महाराज मंदिराजवळीत मंदिरात शिफ्ट होणार असून, ५ एप्रिलपासून त्याला सुरुवात होईल.
डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती