अमरावती काँग्रेसचाच गड; वानखडेंना ४१,६४८ मताधिक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 03:37 PM2024-06-05T15:37:18+5:302024-06-05T15:38:07+5:30

Amravati Lok Sabha Results 2024 : दलित, मुस्लीम समाजाचे जंबो मतदान; 'डीएमके 'चीही साथ

Amravati is the stronghold of Congress; Wankhade has 41,648 votes | अमरावती काँग्रेसचाच गड; वानखडेंना ४१,६४८ मताधिक्य

Amravati is the stronghold of Congress; Wankhade has 41,648 votes

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
तब्बल २८ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेसने अमरावती लोकसभा मतदारसंघात 'पंजा' खेचून आणला. बळवंत वानखडे यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून ४१ हजार ६४८ मतांची आघाडी मिळाली आहे. २६ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी मुस्लीमबहुल भागातील केंद्रावर मतदारांच्या लांबलचक रांगा था काँग्रेस उमेदवाराच्या विजयात 'चौकार' लावणार असा अंदाज बांधला गेला. अखेर मंगळवारी निकालाअंती ते स्पष्ट झाले आहे.


बळवंत वानखडे यांना अमरावतींचा नवा खासदार बनविण्यात माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर या 'किंगमेकर' ठरल्या आहेत, तर अमरावती विधानसभा मतदारसंघाची धुरा माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसचे शहराच्यक्ष बबलू शेखावत या त्रिमूलीकडे सोपविली होती. विशेषतः दलित, मुस्लीम समाजाच्या मतदारांवर विशेष फोकस करताना लहान-सहान घटकांना लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसने लक्ष केले. त्याबरोबर कुणबी, पाटील, देशमुख मतदारांची समर्थ साथ मिळाल्याने बळवंत वानखडे यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून ४१ हजार ६४८ मतांचा लीड घेता आला. वानखडे यांना बडनेरा, मेळघाट वगळता अचलपूर, तिवसा, दर्यापूर आणि अमरावती विधानसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली, हे विशेष. 

महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत एकसंध असल्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना अमरावती विधानसभेतून मताधिक्य मिळविता आले.


आतापर्यंत केवळ दोनच उमेद्वार मतदारांनी रिपीट
• आतापर्यंत अमरावतीकर मतदारांनी डॉ. पंजाबराव देशमुख, कृष्णराव देशमुख, उषा चौधरी, अनंत गुहे व आनंदराव अडसूळ यांना सलग दोनदा खासदार म्हणून निवडून दिले.
•  डॉ. पंजाबराव देशमुख व कृष्णराव देशमुख यांच्यासह शिवसेनेच्या अनंत गुडे यांना तीनदा अमरावतीचा खासदार होण्याची संधी मिळाली. गुढे यांचा १९९८ मध्ये पराभव झाला. मात्र १९९९ व २००४ मध्ये ते सलग दोनदा खासदार झाले.
• उषा चौधरी या २९८० व १९८४ साली व 3 आनंद अडसूळ हे सन २००९ व २०१४ सलग दुसन्यांदा अमरावती लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीत गेले होते, मात्र नवनीत राणा यांनी पक्ष बदल करुनही त्यांना पुन्हा दूसऱ्यांदा खासदारकी मिळविता आली नाही.


काँग्रेसचे विधानसभा, महापालिका निवडणूक टार्गेट 
अमरावती लोकसभा निवडणुकीत बळवंत वानहाडे वांच्या प्रचारादरम्यान शहर काँग्रेसने विधानसभा, महापालिका निवडणूक लक्ष ठेवले होते. त्या दिशेने बांधणीदेखील चालविली आहे. मुस्लीमबहुल भागावर फोकस करताना स्थानिक नेते, कार्यकत्यांची चाचपणीदेखील करण्यात आली आहे. सध्या काँग्रेसच्या सुलभा खोडके या अमरावतीच्या आमदार आहेत.


३० उमेदवारांवर भारी ठरला 'नोटा'
लोकसभा मतदारसंघात यावेळी 'नोटा ला २५४४ मते पडली आहेत. ती सर्व वैध मते आहेत. यावेळी तब्बल ३० उमेदवारांपेक्षा नोटा (नन ऑफ अवाँह) भारी पडला आहे. यावेळी कॉग्रेसचे बळवंत वानखडे, भाजपच्या नवनीत राणा, प्रहारचे दिनेश खूब, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, संजयकुमार गाडगे, किशोर लबडे व सुमित्रा गायकवाड यांना नोटापेक्षा अधिक मते मिळालेली आहेत. याची सर्वत्र चर्चा आहे.


परकोटाच्या आतील भागात काँग्रेसची बल्ले बल्ले
लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर कधी नव्हे पहिल्यांदाच परकोटाच्या आत चळवंत वानखडे यांच्या रूपाने काँग्रेसला मते मिळाली आहेत. एरव्ही बुधवारा, जवाहर गेट, अंबागेट यासह परकोटाच्या आतील भाग हा भाजप-सेनेचा गणला जातो. मात्र, यंदा काँग्रेससोबत ठाकरे सेना सोबत असल्यामुळे माजी खासदार अनंत मुठे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे. प्रवीण हरमकर यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळल्याचे दिसून आले.


अमरावतीतून १ लाख १४ हजार ७०२ मते
बळवंत वानखाडे यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून १ लाख १४ हजार ७०२ मते मिळाली आहे. अमरावती हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. भाजपचे जगटीश गुप्ता है अपवाद वगळता अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार विजयी झाले आहेत. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उषाताई चौधरी, अनंत गुढे, आनंदराव अडसूळ यांनीदेखील अमरावतीचे लोकसभेत नेतृत्व केले आहे.


सट्टाबाजाराचे आकलन खरे ठरले
एक्झिट पोलनंतरही बुकीनी दिलेल्या लाईननुसार अमरावतीची जागा भाजपाच्या हातून जाणार आणि तेथे काँग्रेसच येणार असे सांगितल्याने सटोड्यांनी भरभरून सट्टा लावला होता. राणांवर अनेकांनी कोट्यवधीचे डाव खेळले, त्यामुळे त्या ठिकाणी बुळी जिंकले. शेवटच्या दिवसापर्यंत बळवंत वानखडे यांच्या बाजुने सट्टाबाजार होता.


डॉ. अनिल बोंडे समोर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणा
अमरावती लोकसभा मतदार संघात मतमोजणी आटोपल्यानंतर मतमोजणीतील आकडेवारी जुळत नसल्याचा आक्षेप भाजपच्या वतीने घेण्यात आला. राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यानी आक्षेची तक्रार देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याना देण्यासाठी आले होते. त्यानंतर ते परत जात असतांना उपस्थित काँग्रेस कार्यकत्यांनी डॉ. बोंडे यांच्यासमोर जोरदार घोषणा दिल्या. अबकी बार तडीपार, व जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने वातावरण तणावाचे निर्माण झाले होते.
 

Web Title: Amravati is the stronghold of Congress; Wankhade has 41,648 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.