सौदी अरेबियातून अमरावतीच्या विधी महाविद्यालयाची वेबसाईट 'हॅक'! अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 08:47 PM2017-08-28T20:47:03+5:302017-08-28T20:47:07+5:30

स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची वेबसाईट ‘हॅक’ केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या ४३(अ), ६६(सी) अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सायबर सेलचे पोलीस करीत आहे.

Amravati Law College website hacked from Saudi Arabia! Filed Against the Ombudsman | सौदी अरेबियातून अमरावतीच्या विधी महाविद्यालयाची वेबसाईट 'हॅक'! अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

सौदी अरेबियातून अमरावतीच्या विधी महाविद्यालयाची वेबसाईट 'हॅक'! अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

Next

अमरावती, दि. 28 -  स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची वेबसाईट ‘हॅक’ केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या ४३(अ), ६६(सी) अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सायबर सेलचे पोलीस करीत आहे. सौदी अरेबियातील लोगो झळकत असल्याने हॅकर्स सौदीतील असावे, असा कयास लावला जात आहे. 
विधी महाविद्यालयाची ६६६.१िस्रूि’.ङ्म१ॅ ही वेबसाईट ‘हॅक’ झाली आहे. गाडगेनगर पोलिसांनी पंचनामा करून तपासकार्य सुरु केले आहे. या वेबसाईटच्या ‘सर्व्हर’ची देखभाल कॉटन मार्केट स्थित ‘डॉट कॉम इन्फोटेक प्रा.ली.’कडे आहे. त्यांच्या सर्व्हरमधून साईट हॅक झाली आहे. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आहे. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यामुळे साईट हॅक घाल्याचे लक्षात आले. 

महाविद्यालयाची वेबसाईट ‘हॅक’ झाली. यासंबंधाने पोलीस तक्रार नोंदविण्यात आली. 
- पी.आर.मालवीय, 
प्राचार्य डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती 

विधी महाविद्यालयाची वेबसाईट ‘हॅक’झाली. आम्ही वेबसाईटला सुरक्षा दिली होती. मात्र, तरीसुद्धा हॅकर्स यशस्वी झालेत. हॅकर्सनी वेबसाईटच्या होमपेजवर लोगो टाकला असून तो सौदी अरेबियामधील असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते.
- पंकज बेलसरे, कर्मचारी, डॉट कॉम प्रा.लि.
विधी महाविद्यालयाची वेबसाईट ‘हॅक’ झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून सायबर सेलला माहिती दिली. 
- कैलास पुंडकर, 
पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे

Web Title: Amravati Law College website hacked from Saudi Arabia! Filed Against the Ombudsman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा