अमरावती लोकसभा निवडणूक निकाल 2019 : अमरावतीचा गड शिवसेना राखणार की नवनीत राणा बाजी मारणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:44 PM2019-05-23T12:44:26+5:302019-05-23T12:49:36+5:30
अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र मुख्य लढत ही महाआघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा व महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये आहे.
अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र मुख्य लढत ही महाआघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा व महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून अमरावती लोकसभा मतदारसंघावर 1991 पर्यंत भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील निवडून येईपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2009 नंतर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ दोन वेळा निवडून आले. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेची पकड पाहायला मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अमरावतीमध्ये महायुतीचे उमेदवार (शिवसेना) आनंदराव अडसूळ यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 1,79,074 मतं मिळाली आहेत. तर महाआघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा या पिछाडीवर असून त्यांच्या पारड्यात 1,68,141 मतं पडली आहेत. महायुतीचे अडसूळ 11,933 मतांनी आघाडीवर आहेत.
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदास संघात मनोज कोटक यांची सव्वा लाखाच्या फरकाने आघाडी https://t.co/fUWIufFuiq#LokSabhaElections2019pic.twitter.com/p6CkScXUUh
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2019
2014 लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि आघाडीच्या नवनीत कौर राणा यांचा सामना रंगणार आहे. गेल्या वर्षी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार असणाऱ्या नवनीत कौर राणा यांना युवा स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा होता. लोकसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत भाजपाशी जवळीक साधणारे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. अमरावती मतदारसंघातील एकूण 18 लाख 30 हजार 561 मतदारांपैकी 11 लाख चार हजार 936 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमरावती मतदारसंघाची टक्केवारी 60.36 राहिली आहे.
राज्यात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? https://t.co/u3ncK55QSM#LokSabhaElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2019