Amravati | मोर्शी-वरुड मार्ग मृत्यूचा सापळा; आठ महिन्यांत ३७५ अपघात, २९ 'ब्लॅकस्पॉट'
By प्रदीप भाकरे | Published: October 11, 2022 04:12 PM2022-10-11T16:12:00+5:302022-10-11T16:13:33+5:30
अमरावती-मोर्शी मार्गही धोकादायक
अमरावती : गेल्या आठ महिन्यांतील प्राणांतिक अपघाताची संख्या पाहता, मोर्शी ते वरुड हा मार्ग सर्वाधिक अपघातप्रवण ठरला आहे. त्या मार्गावर तब्बल २२ प्राणांतिक अपघात झालेत. ज्यात २२ पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. त्या पाठोपाठ दर्यापूर ते अंजनगाव मार्गावर १४, तर तिवसा ते लोणी या मार्गावर ११ प्राणांतिक अपघात झाले आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत एकूण ३७५ अपघात झाले. त्यातील २०० प्राणांतिक अपघातात २२२ जणांचा मृत्यू झाला, तर ४३५ जण जखमी झाले. २०० प्राणांतिक अपघातातील १०४ अपघात अत्यंत गंभीर असे होते.
महिनानिहाय अपघात
महिना : एकूण अपघात : प्राणांतिक : मृत्यू : जखमी
जानेवारी : ५० : २७ : २८ : ५१
फेब्रुवारी : ५६ : ३० : ३१ : ६३
मार्च : ५२ : ३१ : ३६ : ५५
एप्रिल : ६१ : ३२ : ३५ : ८६
मे : ६८ : ३१ : ३१ : ७९
जून : ४१ : २२ : २३ : ३७
जुलै : २२ : १४ : २१ : ३४
ऑगस्ट : २५ : १३ : १७ : ३०
असे झाले अपघात
मार्ग : प्राणांतिक अपघात : जखमी
मोर्शी ते वरुड : २२ : ६
अमरावती मोर्शी : १६ : ७
दर्यापूर अंजनगाव : १४ : ६
तिवसा ते लोणी : ११ : १०
परतवाडा अंजनगाव : १० : ६
देवगाव ते शिंगणापूर : ८ : ४
अंजनगाव ते अकोट : ७ : ९
पोलीस ठाणेनिहाय प्राणांतिक अपघात
अचलपूर ३, अंजनगाव १२, आसेगाव २, बेनोडा १२, ब्राह्मणवाडा २, चांदूरबाजार ६, चांदूररेल्वे ३, चिखलदरा ५, दर्यापूर १०, दत्तापूर ३, धारणी ९, खल्लार ५, खोलापूर १, कुऱ्हा १२, लोणी ९, माहुली १२, मंगरुळ चव्हाळा ४, मंगरुळ दस्तगीर १, मोर्शी २०, नांदगाव खंडेश्वर ४, परतवाडा १३, पथ्रोट ६, रहिमापूर ५, सरमसपुरा ३, शेंदुरजनाघाट ३, शिरखेड ६, शिरजगाव ५, तळेगाव १०, तिवसा ३, वरुड ९, येवदा २ एकूण २०० प्राणांतिक अपघात.
वाहतूक विभागाकडून सूक्ष्म विश्लेषण
जिल्ह्यातील अपघातात घट यावी, किंबहुना ते होऊच नयेत, यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी मोठा जनजागर चालविला आहे. अपघात, त्यातील मृत्यू, जखमी एवढेच नव्हे, तर ते अपघात कुठल्या मार्गावर घडले, त्याची नोंद कुठल्या पोलीस ठाण्याच्या दप्तरी झाली, याचे अचूक विश्लेषण त्यांनी केले आहे. त्या विश्लेषणातून शाश्वत उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मॅप बनवून ॲक्सिडंट स्पॉट बनवून ते आयडेंटिफाय केले आहेत.