अमरावतीची डिजिटल सिटीकडे वाटचाल !

By admin | Published: November 12, 2016 12:11 AM2016-11-12T00:11:35+5:302016-11-12T00:11:35+5:30

सिडकोकडून मिळणाऱ्या १०० कोटींमधून अमरावती शहराचे रुपडे पालटणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेत अमरावतीचा डिजिटल अमरावती म्हणून विकास केला जाणार आहे.

Amravati moving towards Digital City! | अमरावतीची डिजिटल सिटीकडे वाटचाल !

अमरावतीची डिजिटल सिटीकडे वाटचाल !

Next

एसपीव्हीची दुसरी बैठक : ५० कोटींचे नियोजन
अमरावती : सिडकोकडून मिळणाऱ्या १०० कोटींमधून अमरावती शहराचे रुपडे पालटणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेत अमरावतीचा डिजिटल अमरावती म्हणून विकास केला जाणार आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी ‘अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ या एसपीव्हीची दुसरी बैठक महापालिका सभागृहात घेण्यात आली.एसपीव्ही या शासकीय कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सुनील पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या याबैठकीत सिडकोकडून पहिल्या हप्त्यापोटी प्राप्त ५० कोटींमधून होणाऱ्या कामांवर चर्चा करण्यात आली. महापौरांच्या अध्यक्षतेतील प्रकल्प समितीने सुमारे ६५ कोटी रुपयांची कामे सुचविली होती. त्यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली.
राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अमरावती महापालिकेला सिडकोकडून १०० कोटींचा निधी मिळणार आहे. या निधीचा पहिला हप्ता म्हणून ५० कोटी रिलिज करण्यासाठी एसपीव्हीचे गठन करणे बंधनकारक होते. त्या अनुषंगाने ‘अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ या एसपीव्हीचे गठन करण्यात आले.

पॅनसिटीअंतर्गत विकास
अमरावती : एसपीव्ही अर्थात ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ ही एक शासकीय कं पनी आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची दुसरी बैठक शुक्रवारी घेण्यात आली. यामध्ये प्रकल्प समितीने सूचविलेल्या कामांबाबत चर्चा झाली. पॅनसिटी संकल्पनेनुसार शहराचा विकास केला जाणार आहे. डिजिटल टेक्निक वापरून विकास साध्य केला जाईल. पॅनसिटीमध्ये संगणकीकृत कमांड व कंट्रोल सेंटर, गुन्हेगारी नियंत्रणासाठी सीसीटीव्ही, तक्रार निवारण तसेच सार्वजनिक उपयुक्तता अ‍ॅप, आॅप्टीकल फायबर नेटवर्क, डाटासेंटर, सोलर पॅनेल, प्रभागनिहाय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, ३ ठिकाणी स्मार्ट पार्किंग, आॅनलाईन हवा व ध्वनीप्रदूषण नियंत्रण प्रणाली, महापालिकेसाठी केंद्रीय माहिती व्यवस्थापन, जीआयएसवर आधारित महसूल वसुली, कर्मचारीक्षमता बांधणी ,डिजिटल साईन बोर्डचा या प्रकल्पांत समावेश आहे. ‘अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ या एसपीव्हीच्या शुक्रवारच्या दुसऱ्या बैठकीला संचालक मंडळाचे अध्यक्ष तथा नियोजन विभागाचे अप्पर सचिव सुनील पोरवाल, महापौर चरणजितकौर नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते,आयुक्त हेमंत पवार, स्थायी सभापती अविनाश मार्डीकर, प्रभारी पोलीस आयुक्त विवेक पानसरे, पक्षनेते बबलू शेखावत, विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर, नगरसेवक तुषार भारतीय, एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश देशमुख आदी उपस्थित होते.

या विषयांवर झाली चर्चा
संचालक मंडळाच्या बैठकीस अनुपस्थित राहण्याबाबत परवानगी द्यावी, सिडकोकडून पा्रप्त होणाऱ्या ५० कोटींमधून प्रकल्प समितीने सूचविलेली कामे करण्याबाबत, एसपीव्हीकरीता मानव संसाधन तज्ज्ञांची नियुक्ती करणे आणि अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या एसपीव्हीचा लोगो कसा असावा, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

महापौर प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी
महापौर चरणजित कौर नंदा यांची एसपीव्ही अंतर्गत सब कमिटी असलेल्या प्रोजेक्ट कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.एसपीव्हीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सुनील पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. स्मार्ट सिटीसाठी पहिल्या हप्त्यात मिळणाऱ्या ५० कोटींमधून शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.प्रोजेक्ट कमिटीत महापौर,जिल्हाधिकारी गित्ते आयुक्त हेमंत पवार आणि एसपीव्हीचे सीईओ महेश देशमुख यांचा समावेश आहे.

Web Title: Amravati moving towards Digital City!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.