Navneet Kaur Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना गृह मंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 05:13 PM2022-04-13T17:13:45+5:302022-04-13T17:42:11+5:30

Navneet Kaur Rana : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार राणा यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानंतर राणा यांच्यासाठी वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. 

Amravati MP Navneet Kaur Rana gets Y Plus security As Directed By Amit Shah | Navneet Kaur Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना गृह मंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा प्रदान

Navneet Kaur Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना गृह मंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा प्रदान

googlenewsNext

अमरावती : खासदार नवनीत राणा Navneet Rana यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. राणा यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार राणा यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानंतर राणा यांच्यासाठी वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. 

नवनीत राणा या सातत्याने राज्य सरकारच्या विरोधात भूमिका लोकसभेत उचलत असतात. देशातील अनेक अनेक ज्वलंत मुद्द्यांना हात घालतात. त्यांचा जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी ही वाय प्लस सुरक्षा यंत्रणा प्रदान करण्याचे निर्देश दिले. 

याच अनुषंगाने खासदार नवनीत राणा यांचे हे वाय प्लस सुरक्षा पथक आज अमरावतीत दाखल होत आहे, ज्यामध्ये एकूण ११ कमांडो, पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे आता राणा यांना देशभरात कुठेही फिरतांना वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच असणार आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांचा देशाच्या VVIP म्हणजेच अति महत्वाच्या व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे.

Read in English

Web Title: Amravati MP Navneet Kaur Rana gets Y Plus security As Directed By Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.