अमरावती-मुंबई एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:38+5:302021-01-21T04:13:38+5:30

अमरावती: कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. गत १० महिन्यांपासून बंद असलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून नियमित वेळेत धावणार आहे. बहुप्रतीक्षेनंतर ...

Amravati-Mumbai Express to run from January 26 | अमरावती-मुंबई एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून धावणार

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून धावणार

Next

अमरावती: कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. गत १० महिन्यांपासून बंद असलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून नियमित वेळेत धावणार आहे. बहुप्रतीक्षेनंतर अंबा एक्स्प्रेस सुरू होत असल्याने पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (गाडी क्रमांक ०२११२ ) ही गाडी विशेष म्हणून सुरू करण्याचा निर्णय १९ जानेवारी राेजी रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचेनत स्पष्ट केले आहे. मुंबई-अमरावती (गाडी क्रमांक ०२१११) ही सीएसएमटी येथून २५ जानेवारी रोजी सुटणार असून, अमरावती रेल्वे स्थानकावर २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी पोहचेल. अमरावतीहून मुंबईकडे सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी रवाना होईल. ही गाडी २२ डब्यांची असणार आहे. मुंबई. ठाणे, दादर, कल्याण, ईगतपुरी, नाशिक, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदूरा, शेगाव, मूर्तिजापूर, बडनेरा व अमरावती असे थांबे या गाडीला राहतील. आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.

Web Title: Amravati-Mumbai Express to run from January 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.