महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष रेल्वे गाडी
By गणेश वासनिक | Published: December 1, 2023 05:02 PM2023-12-01T17:02:48+5:302023-12-01T17:04:57+5:30
५ डिसेंबरला मुंबईकडे जाणार, ७ डिसेंबर राेजी मुंबई येथून अमरावतीला परतणार.
अमरावती : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने अमरावती ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित एक विशेष गाडी चालिण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी ५ डिसेंबर रोजी अमरावती रेल्वे स्थानकाहून मुंबईकडे रवाना होईल, तर ७ डिसेंबर राेजी मुंबई येथून अमरावतीला परत येणार आहे.
अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष गाडी क्रमांक. ०१२२१८ ही ५ डिसेंबर रोजी अमरावती येथून ५ वाजून ४५ मिनिटांनी रवाना होईल. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून २५ मिनीटांनी पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२१७ ही गाडी ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १२ वाजून ४० मिनीटांनी वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२ वाजून ५० मिनीटांनी पोहोचेल.
या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्थानकावर थांबे देण्यात आले आहे. एकूण या गाडीला १४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहे. या विशेष गाडीने प्रवास सुखकर व्हावा आणि प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन भुसावळ रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.