Amravati Municipal Corporation Election : महिला आरक्षणाने बिघडविले समीकरण; दिग्गजांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 05:17 PM2022-05-31T17:17:44+5:302022-05-31T18:13:24+5:30

अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण‍ सोडत जाहीर करण्यात आली आहे.

Amravati Municipal Corporation Ward Wise Reservation Seats announced for election | Amravati Municipal Corporation Election : महिला आरक्षणाने बिघडविले समीकरण; दिग्गजांची गोची

Amravati Municipal Corporation Election : महिला आरक्षणाने बिघडविले समीकरण; दिग्गजांची गोची

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला आरक्षणाने बिघडविले समीकरण, विद्यमानांना उमेदवारीची चिंता

अमरावती : महापालिकेच्या प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकीसाठीची बहुप्रतिक्षित महिला आरक्षणाची सोडत मंगळवारी काढण्यात आली. या सोडतीमुळे अनेक दिग्गजांसमोर प्रभाग बदलून निवडून येण्याचे आव्हान असणार आहे. तर, अनेक ठिकाणी पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी एकाच पक्षाच्या दोन मावळत्या नगरसेवकांमध्ये मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे. एकुण ९८ पैकी तब्बल ३२ जागा खुल्या असून, तेथेच सर्वाधिक चुरस व स्पर्धा असेल. एकंदरितच महिला आरक्षणाने अनेकांची समीकरणे बिघडविली आहेत.

९८ सदस्यीय अमरावती महापालिकेत ४९ महिला सदस्य असतील. त्याअनुषंगाने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता एससी, एसटी व सर्वसाधारण महिलांसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यास सुरूवात झाली. महापालिका शाळेतील बालकांच्या हस्ते ती सोडत काढली गेली. तर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी ते आरक्षण घोषित केले.

मंगळवारी एससीसाठी राखीव असलेल्या १७ जागांपैकी ९, एसटीच्या दोन पैकी एक व सर्वसाधारण संवर्गातील नऊ जागांवरील महिला आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीसाठी अनेक माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी भवन गाठून आपआपल्या प्रभागातील समीकरणे जाणून घेतली. सोडतीसाठी उपायुक्त सुरेश पाटील, सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे उपस्थित होते.

खु्ल्या जागेवर मदार

९८ पैकी ४० जागा खुल्या आहेत. त्यात सर्वाधिक ३२ जागा ‘क’ आहेत. तर ‘ब’मध्ये देखील ८ जागा सर्वसाधारण आहेत. त्यामुळे सर्वाधिक चुरस या ४० जागांवर असेल. महिलांसाठी असलेल्या ४९ जागांपैकी ३९ सर्वसाधारण, ९ एससी व एक एसटीची आरक्षित आहे. १६ प्रभागात प्रत्येकी दोन महिला असतील.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे..

Web Title: Amravati Municipal Corporation Ward Wise Reservation Seats announced for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.