परतवाड्याच्या दरोडा प्रकरणात तिघे जेरबंद; जालन्यातून ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 01:31 PM2019-08-28T13:31:02+5:302019-08-28T13:36:32+5:30

परतवाड्यातील ईश्वरलाल पन्नालाल अग्रवाल ज्वेलर्समधील दरोडाप्रकरणी जालन्यातून तिघांना अमरावती एलसीबीने अटक केली आहे.

amravati paratwada Three arrested in robbery case | परतवाड्याच्या दरोडा प्रकरणात तिघे जेरबंद; जालन्यातून ठोकल्या बेड्या

परतवाड्याच्या दरोडा प्रकरणात तिघे जेरबंद; जालन्यातून ठोकल्या बेड्या

Next

अमरावती - परतवाड्यातील ईश्वरलाल पन्नालाल अग्रवाल ज्वेलर्समधील दरोडाप्रकरणी जालन्यातून तिघांना अमरावती एलसीबीने अटक केली आहे. २७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींजवळून मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
परतवाड्याच्या दरोड्यात दरोडेखोरांनी ७८ लाखांचे सुवर्णालंकार चोरल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात या दरोड्याचा पर्दाफाश करण्यासाठी पथके कार्यान्वित केली होती.

शिकलकरी समाजाची टोळी या चोरीत सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी विजयसिंग कृष्णासिंग भादा (३५), संजूसिंग कृष्णासिंग भादा (२४) तसेच सुंदरसिंह सुकलालसिंह राजपूत (३०) यांना ताब्यात घेतले. सुंदरचा बाप परतवाडा यथे लालपुलाजवळ राहतो. त्यांनी त्याच्याकडे येऊन एक दिवस आधी रेकी केली. दरोड्यानंतर रात्री ३ वाजता इंडिका कारने ते अमरावती येथे इतवाऱ्यातील केजीएन ट्रेडर्सजवळ आले. तेथे त्यांचे वाहन नादुरुस्त झाल्याने ती कार त्यांनी तेथेच सोडली. तेथून १०० मीटर पायी चालत गेले.

एका आॅटोरिक्षाला थांबवून अमरावती बस स्थानकात सोडून मागितले. सकाळी ५.३० च्या एसटीने जालन्याला निघाले. अमरावती एलसीबीने सीसीटीव्हीवरून आॅटोरिक्षाचा शोध घेतला. त्याच्याकडून माहिती काढून पोलिसांनी जालना गाठले. तेथील लोधीपुरा भागातील गुरू गोविंदसिंगनगर भागातून त्यांना पहाटे ५ वाजता ताब्यात घेण्यात आले. सकाळी ९.३० वाजता पोलीस पथक या दरोडेखोरांना घेऊन अमरावतीत आले. या टोळीने चांदूर बाजार येथेही दरोडा घातल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे.

Web Title: amravati paratwada Three arrested in robbery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.