ते गाडी करून आले, एक पोरगा टपावर चढला; अन् झळकवला सरकारविरोधी बॅनर!
By उज्वल भालेकर | Published: January 18, 2024 06:29 PM2024-01-18T18:29:18+5:302024-01-18T18:31:07+5:30
केंद्र सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याने शेतमालाला भाव नसल्याचा संताप यावेळी या युवकांनी व्यक्त केला.
अमरावती: शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी अचानक काही युवक दुपारच्या सुमरास एका वाहनाने आले. त्यांनी यावेळी रत्यावरच आपले वाहन थांबून एक युवक हातामध्ये केंद्र सरकार विरोधातील बॅनर घेवून या वाहनावर चढला आणि केंद्र सरकारविरोधात नारेबाजी करायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. केंद्र सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याने शेतमालाला भाव नसल्याचा संताप यावेळी या युवकांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने नवनवीन आयात निर्यात धोरण आणून शेतीमालाचे भाव पाडण्याचा धंदा सुरु केल्याचा अरोप आंदोलनकर्ता युवकांनी केला आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज देशभरातील शेतकरी संकटात असून आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कर्ज माफी नको, वार्षिक ६ हजार रुपयांची मदतही नको. त्यांना फक्त त्यांच्या शेतमालाला भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांची होणारी लूट थांबावी अशी मागणी यावेळी आंदोलनातून युवकांनी केली. या आंदोलनामध्ये नीतीन मोकलकर, दिपक वानखडे, तेजस मोकलकर, सुशांत मालधुरे, सोमेश जोंधळे या युवकांचा सहभाग होता.