अमरावती-पुणे वातानूकुलित स्पेशल 'ट्रेन' मंजूर

By admin | Published: October 3, 2016 12:15 AM2016-10-03T00:15:31+5:302016-10-03T00:15:31+5:30

अमरावती - पुणे वातानुकुलित स्पेशल ट्रेन मंजूर करण्यात आली आहे.

Amravati-Pune air-conditioned special train 'approved' | अमरावती-पुणे वातानूकुलित स्पेशल 'ट्रेन' मंजूर

अमरावती-पुणे वातानूकुलित स्पेशल 'ट्रेन' मंजूर

Next

रेल्वेमंत्री येण्याचे संकेत : ६ आॅक्टोबर रोजी होणार शुभारंभ
अमरावती : अमरावती - पुणे वातानुकुलित स्पेशल ट्रेन मंजूर करण्यात आली आहे. या रेल्वे गाडीचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ६ आॅक्टोबर रोजी होण्याचे संकेत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून खा. आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे.
अमरावतीत रविवारपासून सुरू झालेल्या जाणता राजा या महानाट्यात येण्याबाबतचे पत्र रेल्वेमंत्री प्रभू यांना देण्यात आले आहे. ना. प्रभू यांनी ६ आॅक्टोबर रोजी येण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार अमरावती- पुणे मंजूर झालेल्या रेल्वे गाडीचा शुभारंभ ना. प्रभू यांच्या हस्ते करण्याची तयारी देखील रेल्वे प्रशासनाने चालविली आहे. तसेच बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन रिपेअरींग वर्कशॉप प्रोजेक्ट भूमिपूजन करण्याचे प्रस्तावित आहे.
खा. आनंदराव अडसुळ यांनी अमरावती येथील नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्याची फलश्रूती म्हणून रेल्वेमंत्री यांचेकडून दखल घेण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार अमरावती-पुणे वातानुकुलीत नवीन गाडी मंजूर करण्यात आली आहे.
नागपूर-अमृतसर ही वातानुकुलीत गाडी नागपूरवरून अमृतसर जाणार आहे. ही गाडी दर मंगळवारी नागपूर येथून बडनेरा-मनमाड-दौंड मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या गाडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी पुणे येथून दर बुधवारी आणि गुरूवारी अमरावती मॉडल स्टेशन येथून सोडण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. या रेल्वे गाडीमुळे आठवड्यातून दोन दिवस अमरावतीकरांना पुणे येथे जाण्या व येण्याची सोय उपलब्ध होणार आहे. सदर गाडी ही अमरावती मॉडेल स्टेशन येथून १२.४५ वाजता सुटणार असून ही गाडी १३.५ बडनेरा, १४.१० अकोला, १६.१५ भुसावळ, १९.६ मनमाड, २०.२७ कोपरगाव, २२.५७ अहमदनगर, ०१.५ दौंड, पुणे या ठिकाणी पोहचणार आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान ६ आॅक्टोंबर रोजी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करावा, अशी विनंती ना. प्रभू यांना करण्यात आली आहे. सन २०१०-११ मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी २७४.५७ कोटी पिंक बूक आयटम क्रमांक ३३४ नुसार बडनेरा वॅगन रिपेरींग फॅक्टरीकरीता मंजूर केले होते. फॅक्टरीसाठी १८९ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. ३१६.१० कोटी रुपयाला रेल्वे मंत्रालयातर्फे मंजुरी प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Amravati-Pune air-conditioned special train 'approved'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.