Amravati: अमरावतीत रासायननिक खताचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर छापा

By प्रदीप भाकरे | Published: October 12, 2024 06:29 PM2024-10-12T18:29:44+5:302024-10-12T18:29:59+5:30

Amravati Crime News: शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने  नांदगाव पेठ हददीमध्ये  धाड घालून  ट्रक व खतासह सुमारे तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. युनिट वन ने 11 ऑक्टोबर रोजी उशिरा रात्री ही कारवाई केली.  

Amravati: Raid on black market gang of chemical fertilizers in Amravati | Amravati: अमरावतीत रासायननिक खताचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर छापा

Amravati: अमरावतीत रासायननिक खताचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर छापा

- प्रदीप भाकरे 
अमरावती -  शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने  नांदगाव पेठ हददीमध्ये  धाड घालून  ट्रक व खतासह सुमारे तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. युनिट वन ने 11 ऑक्टोबर रोजी उशिरा रात्री ही कारवाई केली. वडगाव माहुरे शेत शिवारामध्ये बत्रा यांच्या प्लॉटच्या आवारात रात्रीच्या वेळी  काही इसम १६ चक्का ट्रकमधून खताचे पोते खाली उतरवून दूस-या पोत्यात ते  भरत आहे, अशा माहितीवरून युनीट कं. ०१ चे अधिकारी व अंमलदार तेथे पोहोचले.

घटनास्थळावर जावून पाहणी केली असता तिन इसम हे ट्रक कं. एम एच २७ बि क्यु ९७८६ व्या बाजूला उभे असून काही मजूर हे ट्रक मधून पिवळया कलरच्या खताचे पोते ज्यावर भारतीय जन उर्वरक परियोजना भारत युरीया असे लिहलेले खतांचे पोते उतरवून पांढ-या कलरच्या पोत्यात ज्यावर टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रियल  युज ओन्ली, असे लिहलेल्या पोत्यात त्याचे वजन काटयावर वजन करून त्याला मशीनद्वारे रिसिल करताना दिसून आले. बिलाबाबत विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचे बिल त्यांच्याकडे मिळाले नाही. दरम्यान याबाबत कृषी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट वन व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकची पाहणी केली. तेथील एम एच २७ बि क्यु ९७८६ या ट्रकमध्ये खताचे १८९ पोते दिसुन आले. तसेच खाली जमीनीवर ताडपत्रीवर ४३८ बॅग दिसून आल्या.  पिवळया रंगाचे खताचे पोते ज्यावर भारतीय जन उर्वरक परियोजना भारत युरीया असे लिहलेले खतांचे पोत्यांची उघडुन पाहणी केली असता त्यामध्ये युरीया खत असल्याचे दिसुन आले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या तिघाना ताब्यात घेण्यात आले. त्यात संजय रमेशचंद्र अग्रवाल, वय ५४ वर्ष रा. प‌द्मावती चौक, पुलगाव रोड, आर्वी जिल्हा वर्धा), अशोक धनराज रावलानी, (वय ५४ वर्ष रा. कृष्णा नगर, अमरावती) व ट्रक चालक दिनेशकुमार छबराज यादव, (वय ४५ वर्ष, रा. रमबीयाल गंज, ता. मनीयाहू नि. जौनपूर,उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे. त्यांना खत परवाना व खरेदी पावती आहे अगर कसे याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणताही परवाना व खरेदी पावती नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून  पिवळ्या रंगाचे १८९ बॅग प्रती बॅग ४५ किलो वजन असलेले  ४. २५ लाख रुपयांचे खत, १०. ९५ लाख रुपये किमतीचे पांढ-या रंगाचे ४३८ बॅग प्रती बॅग ५० किलो वजनाचे खत  व १५ लाख रुपये किमतीचा  ट्रक, १५ हजार रुपये किमतीची  पोत्यांची शिलाई करणे करिता वापरण्यात येणारी ईलेक्ट्रीक शिलाई मशीन व दहा हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण  ३० लाख ४६ हजार ६०१ रुपयांचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

तिन्ही आरोपी हे स्वत:च्या आर्थिक फायदया करिता शासनाने शेतक-याना दिलेल्या अनुदानाच्या खताचा काळा बाजार करताना मिळून आले. कृषी अधिकारी  प्रविण विजय खर्चे, वय ४५ वर्ष, खत निरीक्षक तथा मोहिम अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे तकार वरून पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथे गुन्हा नोद करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस स्टेशन नादंगाव पेठ करित आहे. 

सदरची कारवाई  पोलीस आयुक्त, नवीनचन्द्र रेडडी, पोलीस उपआयुक्त कल्पना बारवकर मॅडम (मुख्यालय), पोलीस उपआयुक्त सागर पाटील,  सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे, सहायक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली  युनिटकं, ०१ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे व  योगेश इंगळे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा फिरोज खॉन, सतिष देशमुख, अलीमउददीन खतीब, नाईक पोलीस अमंलदार नाझिउददीन सैयद, विकास गुडदे, पोलीस अमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, अमोल मनोहर, चालक रोशन माहुरे, किशांर खेंगरे तसेच कृषी विभागचे अधिकारी राहूल सातपूते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अमरावती, अजय तळेगावकर जिल्हा कृषि अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती, प्रविण विजय खर्चे, खत निरीक्षक तथा मोहिम अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, उध्दव संतराम भायेकर, कृषि अधिकारी पंचायत समिती अमरावती, व स्टाफ यानी केलेली आहे.

Web Title: Amravati: Raid on black market gang of chemical fertilizers in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.