Amravati: रेड्यांची टक्कर घेतली, वनाधिकाऱ्यांची धाड पडली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 12:02 AM2024-03-21T00:02:42+5:302024-03-21T00:03:00+5:30

Amravati News: राखीव वनक्षेत्रात रेड्यांची झुंज लावताच वनाधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि मालवाहू वाहनासह पाच वाहने ताब्यात घेतली. याशिवाय आयोजकांसह उपस्थितांवर वनक्षेत्रात शिरकावप्रकरणी वनगुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

Amravati: Raids clashed, forest officers raided | Amravati: रेड्यांची टक्कर घेतली, वनाधिकाऱ्यांची धाड पडली

Amravati: रेड्यांची टक्कर घेतली, वनाधिकाऱ्यांची धाड पडली

- मनीष तसरे
अमरावती - राखीव वनक्षेत्रात रेड्यांची झुंज लावताच वनाधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि मालवाहू वाहनासह पाच वाहने ताब्यात घेतली. याशिवाय आयोजकांसह उपस्थितांवर वनक्षेत्रात शिरकावप्रकरणी वनगुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वनविभागाने त्वरेने केलेल्या कारवाईमुळे पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला, तर झुंजीसाठी पायपीट करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

महाराष्ट्रात रेड्यांच्या टकरी लावण्यास बंदी असली तरी अनेक ठिकाणी त्या लावण्यात येतात. बुधवारी वडाळी येथील फुटका तलाव परिसरात ही टक्कर लावण्यात आली. त्याची माहिती मिळताच अनेक हौशींनी गर्दी केली. काहींनी पायीच, तर काहींनी दुचाकीने हे ठिकाण गाठले. मात्र, अनेक लोक जंगलात शिरल्याचे आणि अनधिकृत असलेली रेड्यांची टक्कर होत असल्याचे कळताच वडाळी रेंजच्या वनअधिकारी वर्षा हरणे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि सहकाऱ्यांसमवेत तेथे असलेली वाहने जप्त केली. यात एक मालवाहू वाहन, तर पाच दुचाकी त्यांनी घटनास्थळावरून जप्त केल्या.

राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी शिरकावास मनाई असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांनी हा प्रकार केला तसेच अनधिकृत झुंज लावल्याप्रकरणी आयोजकांसह उपस्थितांवर वनगुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू होती. या घटनेची माहिती त्यांनी फ्रेजरपुरा पोलिसांनासुद्धा दिली.

Web Title: Amravati: Raids clashed, forest officers raided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.