अमरावतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:50 PM2019-01-13T22:50:41+5:302019-01-13T22:51:00+5:30

अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलानजीक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर १८ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यात ५३६३ कार्यकर्ते राहतील. तसेच पूर्ण वेळ शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.

The Amravati Rashtriya Swayamsevak Sangh's Vidarbha Province Migrant Worker Camp | अमरावतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर

अमरावतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर

googlenewsNext
ठळक मुद्देपत्रपरिषद : सरसंघचालक मोहन भागवत, ५३६३ कार्यकर्ते राहणार उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलानजीक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर १८ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यात ५३६३ कार्यकर्ते राहतील. तसेच पूर्ण वेळ शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.
प्रवासी कार्यकर्ता शिबिरासाठी २७ एकरांच्या जागेत भव्य अंबानगरी उभारण्यात आली. या नगरीत पाच उपनगरे राहणार आहेत. रिद्धपूर, ऋणमोचन, कौंडण्यपूर, मुक्तागिरी व गुरूकुंज नगर असे नाव देण्यात आले आहेत. शिबिरात सहभागी होणाºया विदर्भातील ५,३६३ कार्यकर्त्यांची निवासाची व्यवस्था या उपनगरात राहणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येत छोटे तंबू उभारण्यात आले आहेत. शिबिरस्थानी साकारत असलेल्या अंबानगरीचे प्रवेशद्वार अमरावती शहरातल्या ऐतिहासिक अंबागेटच्या प्रतिकृतीचे राहणार असून, सोबतच परकोटासमान भिंतही राहणार आहे. या संपूर्ण शिबिराची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगराकडे आहे. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समाजातील विविध स्तरातील ३० मान्यवरांची स्वागत समिती तयार करण्यात आली आहे. तसेच १७ जानेवारीला संघ कार्यातील विविध प्रकल्पांची माहिती व क्षणचित्रांचे प्रदर्शन होईल, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. यावेळी उद्योगपती संजय जाधव, प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार, शिबिर महाव्यवस्था प्रमुख शैलेश पोतदार, प्रचार प्रमुख अनिल सामरे, सुजय पवार हे उपस्थित होते.
भागवत पूर्णवेळ उपस्थित राहणार
राष्ट्रीय प्रवासी शिबिराला प्रांत सरसंघचालक शिबिर स्थळीवरच पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत सह. सरकार्यवाह भागय्याजी, अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे अन्य क्षेत्रीय अधिकारी उपस्थित राहणार असून व शिबिराला उपस्थित कार्यकर्त्यांना दिशाबोध करणार आहेत. सरसंघचालकांचे शहरात इतरत्र कुठेही कार्यक्रम नियजित नसल्याचे ते कार्यक्रम स्थळीच पूर्णवेळ राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: The Amravati Rashtriya Swayamsevak Sangh's Vidarbha Province Migrant Worker Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.