अमरावती : तीन दिवसांत मागवला प्रपत्रासह संयुक्त अहवाल, विभागीय आयुक्तांना सूचना; अवकाळी, गारपिटीने शेती व फळपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 03:50 PM2018-02-13T15:50:17+5:302018-02-13T15:50:41+5:30

राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने नुकसानाबाबत प्रपत्र व संयुक्त पंचनाम्यासह अहवाल तीन दिवसांत मागविला आहे.

Amravati: Report to the departmental commissioner for joint reports with the proposal filed in three days; Eventually, the hailstorm damaged agriculture and fruit crops | अमरावती : तीन दिवसांत मागवला प्रपत्रासह संयुक्त अहवाल, विभागीय आयुक्तांना सूचना; अवकाळी, गारपिटीने शेती व फळपिकांचे नुकसान

अमरावती : तीन दिवसांत मागवला प्रपत्रासह संयुक्त अहवाल, विभागीय आयुक्तांना सूचना; अवकाळी, गारपिटीने शेती व फळपिकांचे नुकसान

googlenewsNext

अमरावती : राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने नुकसानाबाबत प्रपत्र व संयुक्त पंचनाम्यासह अहवाल तीन दिवसांत मागविला आहे. महसूल विभागाचे यासंदर्भातील पत्र विभागीय आयुक्तांना सोमवारी उशिरा दिले. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिका-यांना सूचना देऊन अहवाल मागविला आहे.
महसूल विभागाच्या पत्रानुसार, अवेळी पाऊस व गारपिटीमुळे पिके व फळपिकांच्या नुकसानाबाबत संयुक्त पंचनामे करून प्रपत्र अ, ब, क व ड मध्ये सविस्तर प्रस्ताव जिल्ह्यांद्वारा पाठविण्यात येणार आहे. यामध्ये पिकांच्या नुकसानाबाबत ३३ ते ५० टक्के व ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राची विगतवारी स्वतंत्रपणे दर्शविण्यात यावी, अशा सूचना महसूल विभागाने केल्या आहेत. या दोन्ही प्रकारांतील नुकसानाचे स्वतंत्र प्रपत्र व संयुक्त सर्वेक्षण तालुकास्तरीय समितीने करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांकडे एकत्रित संयुक्त स्वाक्षरी अहवाल तीन दिवसांच्या आत जिल्हाधिकाºयांनी मागविले आहेत. अमरावती विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व  अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला तसेच चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत, तर सोमवारी सायंकाळी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती व फळपिकांचे नुकसान झाले आता या नुकसानाचे युद्धस्तरावर पंचनामे करण्यात येणार आहेत.

Web Title: Amravati: Report to the departmental commissioner for joint reports with the proposal filed in three days; Eventually, the hailstorm damaged agriculture and fruit crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.