अमरावती एसडीओ कार्यालयाचे संकेतस्थळ, आता ही संकल्पना राज्यभर राबविणार

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 29, 2025 14:53 IST2025-03-29T14:52:45+5:302025-03-29T14:53:48+5:30

महसूलमंत्र्यांची घोषणा : सर्व माहिती नागरिकांसाठी उपयुक्त असल्याची ग्वाही

Amravati SDO office website, now this concept will be implemented across the state | अमरावती एसडीओ कार्यालयाचे संकेतस्थळ, आता ही संकल्पना राज्यभर राबविणार

Amravati SDO office website, now this concept will be implemented across the state

अमरावती : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे तयार करण्यात आलेले संकेतस्थळ नागरिकांच्या माहितीसह त्यांच्या उपयोगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही संकल्पना आता राज्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केली.

या संकेतस्थळामध्ये ॲडमिनिस्टेस्ट्रीव्ह सेटअपमध्ये कर्मचारी ते अधिकारी यांची नावे व त्यांना नेमून दिलेले काम, याची माहिती उपलब्ध असल्याने नागरिकांनी नेमके कुणाकडे जावे, याविषयी अडचण राहणार नाही, शिवाय रोहयो, अन्न व नागरी पुरवठा, संजय गांधी निराधार योजना, माहितीचा अधिकार कायदा, लोकसेवा हक्क योजना, सर्व कायदे, अनुषंगाने शासन निर्णय योजनेच्या लाभ घेण्यासाठी अटी व आवश्यक नमुने उपलब्ध करण्यात आलेले आहेत. याशिवाय कार्यालयाचा हेल्पलाइन क्रमांक व ई-मेल देण्यात आल्याची माहिती अमरावतीचे एसडीओ अनिल भटकर यांनी महसूलमंत्र्यांना दिली. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ही महत्त्वाची उपलब्धी असल्याचे महसूलमंत्री म्हणाले. यावेळी माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण तायडे, आमदार केवलराम काळे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.

क्यूआर कोडची निर्मिती
यामध्ये संकेतस्थळावर प्रवेश करण्यासाटी क्यूआर कोडची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिक सुलभतेने यामध्ये प्रवेश करू शकतात. या संकेतस्थळाचे ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार व जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Amravati SDO office website, now this concept will be implemented across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.