अमरावतीत रंगला सखी महोत्सव-२०१७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2017 12:13 AM2017-05-01T00:13:38+5:302017-05-01T00:13:38+5:30

‘लोकमत’ सखी मंचद्वारे आयोजित पॉवर बाय बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ स्थानिक अभियंता भवन, शेगाव नाका चौक, येथे २६ एप्रिलला मोठ्या उत्साहात पार पडला.

Amravati Shrine Sakhi Festival-017 | अमरावतीत रंगला सखी महोत्सव-२०१७

अमरावतीत रंगला सखी महोत्सव-२०१७

googlenewsNext

नृत्य, वेशभूषा, एकपात्री प्रयोग, हस्तकला स्पर्धेचे आयोजन : स्वाभिमान मोहिमेंतर्गत सशक्तीकरणाचे धडे
अमरावती: ‘लोकमत’ सखी मंचद्वारे आयोजित पॉवर बाय बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ स्थानिक अभियंता भवन, शेगाव नाका चौक, येथे २६ एप्रिलला मोठ्या उत्साहात पार पडला. येथील सभागृहात झालेल्या महोत्सवाला महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याठिकाणी सोलो डान्स स्पर्धा, सोलो अ‍ॅक्टिंग स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, कुकरी शो स्पर्धा, मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्यावतीने ‘स्वाभिमान’ या विशेष मोहिमेंतर्गत महिलांना सशक्तीकरणाचे धडे देण्यात आले.
सखींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसांची लयलूट, हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. कला, नृत्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सोलो डान्स स्पर्धेचा प्रथम क्रमांक सोनिया राऊत, द्वितीय क्रमांक कुंदा पुसदकर, तृतीय क्रमांक शीतल चौधरी, प्रोत्साहनपर पुरस्कार कांचनगौरी दिवे, सोलो अ‍ॅक्टिंग स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक तृप्ती व्यवहारे, द्वितीय क्रमांक विमल नलावडे, तृतीय क्रमांक विमल खोकले, फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा प्रथम क्रमांक अश्लेषा काळे, द्वितीय क्रमांक अपर्णा पेठे, तृतीय क्रमांक प्रतिभा सदावर्ते, मेहेंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक राणी माले, द्वितीय क्रमांक तन्वी देशमुख, तृतीय क्रमांक भावना देशमुख, प्रोत्साहनपर वर्षा इंगोले यांनी पटकावला.
कुकरी स्पर्धेतील प्रथम क्रमांक नंदा उगले, द्वितीय क्रमांक पल्लवी देशमुख, तृतीय क्रमांक लीना मोहोड, प्रोत्साहनपर पुरस्कार सीमा शिंदे यांनी प्राप्त केला. सखी मंच परिवारातील महिला सभासदांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत विविध कला सादर केल्या. सखी मंचच्या माध्यमातून मिळालेल्या व्यासपीठामुळे सखींनी लोकमतचे विशेष आभार मानले. स्वाभिमान याविशेष मोहिमेदरम्यान राबविण्यात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले. कुटुंबाला आर्थिक हातभार लाऊन स्वावलंबनाचे धडे देण्यात आले.
यावेळी उपस्थित महिलांनी स्वत:चे अनुभव मांडत इतर महिलांना करिअर घडविण्याची पे्ररणा दिली. उपस्थित महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ तसेच प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. बिर्ला सनलाईफच्यावतीने महिलांना प्रेरणा देण्याकरिता विशेष चित्रफित याठिकाणी दाखविण्यात आली. या समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना सशक्तीकरणाचे धडे देत उत्तम करिअर घडविण्याचा मोलाचा सल्ला दिला. प्रमुख पाहुणे बिरला सन लाइफ इन्शूरन्सचे सिनियर एरिया ट्रेडिंग मॅनेजर परेश कुलकर्णी, बिरला सन लाईफ इन्शुरन्सचे ब्रँच मॅनेजर प्रशांत चेने तर परीक्षक म्हणून नृत्य दिग्दर्शक प्रकाश मेश्राम, मॉडेलिंग व अभिनयतज्ज्ञ पंकजा इंगळे, पोषण आहारतज्ज्ञ भावना देशमुख, शगून ग्रुप प्रमुख भावना तापडिया यांनी तर सूत्रसंचालन सुषमा कोठीकर यांनी केले.

Web Title: Amravati Shrine Sakhi Festival-017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.