फिल्ड क्राफ्ट डेमो, स्वच्छ गट स्पर्धेत अमरावती एसआरपीएफ अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:56+5:302021-03-08T04:13:56+5:30
बल गट क्रमांक ९, राज्य राखीव पोलीस दलाचा ७३ वा वर्धापन दिन, आदर्श अधिकारीही फोटो - संजय माटे यांच्याकडे ...
बल गट क्रमांक ९, राज्य राखीव पोलीस दलाचा ७३ वा वर्धापन दिन, आदर्श अधिकारीही
फोटो - संजय माटे यांच्याकडे आहेत.
अमरावती : राज्या राखीव पोलीस दलाच्या स्थानिक बल गट क्रमांक ९ च्या जवानांनी ७३ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आयोजित विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत. एरवी अंगात शक्य तेवढी ताकद एकवटून फटके लगावणाऱ्या या पोलिसांनी आदर्श कूक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. फिल्ड क्राफ्ट डेमो, स्वच्छ गट स्पर्धेत अमरावती एसआरपीएफ अव्वल ठरले.
देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ६ मार्च १९४८ रोजी स्थापन करण्यात आलेल्या राज्य राखीव पोलीस बलाचा ७३ वा वर्धापन दिन राज्यातील सर्व दलांमध्ये साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त नानवीज येथील प्रशिक्षण केंद्रात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांमधून आदर्श पोलीस अधिकारी, राज्यस्तरीय स्वच्छ गट, फिल्ड क्राफ्ट डेमो, आयुधिक शाखा व आदर्श कुक स्पर्धा यांचा समावेश होता.
अमरावती स्थित राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ यांनी गट स्वच्छता ट्रॉफी पटकावली. पोलीस निरीक्षक गटात .................. हे आदर्श अधिकारी ठरले. आयुधिक शाखा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून ट्रॉफी पटकावली. फिल्ड क्राफ्ट डेमो स्पर्धेत नागपूर परिक्षेत्रातून प्रथम व राज्य राखीव पोलीस बलाममधील सर्व गटांमधून द्वितीय पुरस्कार मिळविला. आदर्श कूक स्पर्धेत द्वितीय पारितोषिकावर नाव कोरले. स्पर्धेची तयारी नोव्हेंबर २०२० पासून समादेशक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ ने केली होती.
--------------
दिनदर्शिकेत स्थान
वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिनदर्शिका प्रकाशित केली. सदर दिनदर्शिकेमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी सर्व छायाचित्रे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९, अमरावती येथील आहेत.