Amravati: २२ गुन्ह्यात फरार असलेली मध्य प्रदेशातील चोर जोडी अटकेत
By प्रदीप भाकरे | Published: August 3, 2023 07:53 PM2023-08-03T19:53:40+5:302023-08-03T19:54:05+5:30
Amravati: मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच सिमेवरील जिल्ह्यात चोरी तसेच घरफोडी करणारे व वरूड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या २२ गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोघांना छत्तीसगड येथील बालोद जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.
अमरावती - मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच सिमेवरील जिल्ह्यात चोरी तसेच घरफोडी करणारे व वरूड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या २२ गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोघांना छत्तीसगड येथील बालोद जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात ही यशस्वी कारवाई करण्यात आली. वरूड येथील गुन्ह्यात ते दोन तीन वर्षांपासून फरार होते.
संगमसिंग जगदिशसिंग बावरी (३८) व चरणसिंग गब्युसिंग भादा (३३, दोन्ही रा. शास्त्री नगर पांढुर्णा, मध्यप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरूड पोलीस ठाण्याने त्यांची कसून चौकशी करत पो.स्टे. वरुड येथील २२ गुन्हे उघडकीस आणले. त्यांचेकडून दहा गुन्हयातील २.३५ लाख रुपये किमतीचे ५८ ग्रॅम ९०० मिली सोण्याचे दागिणे, ४९ हजार ५०० रुपये रोख व १० हजार रुपये किमतीची तूर असा माल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या नेतृत्वात मोर्शीचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण, वरुडचे सहायक पोलीस निरिक्षष लक्ष्मण चिंचोले, पोलीस उपनिरीक्षक धिरज राजुरकर, मंगेश शेगोकार, राजु मडावी, दिपक जाधव, देविदास उईके, सुनिल आकोलकर, राजकुमार डिहीये, नंदकिशोर गवते, विनोद पवार, राजु चव्हाण, सचिन भगत, रत्नदिप वानखडे, योगेश ढंगारे, आकाश शेंडे, प्रफुल लेव्हरकर, जॉन रूवन, किरण गावडे, चैतन्य कुंटलवार, आकाश आमले, अमित जिचकार, पुनम डाहाके, रूपाली राउत, स्वप्ना बारसे, दिगांबर बावणे यांनी ही कारवाई केली.