Amravati: वडिलांना मारण्याची धमकी देऊन त्याने धरला चुंबनाचा हेका!
By प्रदीप भाकरे | Published: September 18, 2023 01:14 PM2023-09-18T13:14:45+5:302023-09-18T13:15:07+5:30
Amravati: वडिलांना मारण्याची धमकी देऊन एका तरूणीला जबरदस्तीने बोलावत तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यास नकार दिला असता आरोपीने तिला शिविगाळ करून जीवाने ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
- प्रदीप भाकरे
अमरावती - वडिलांना मारण्याची धमकी देऊन एका तरूणीला जबरदस्तीने बोलावत तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यास नकार दिला असता आरोपीने तिला शिविगाळ करून जीवाने ठार मारण्याची धमकी देण्यात आली. १७ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी, पिडिताच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी रवी धुर्वे (रा. अमरावती) याच्याविरूध्द विनयभंग व धमकीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर रोजी सुटी असल्याने संबंधित तरूणी घरीच होती. दुपारी दोनच्या सुमारास आरोपी रवि धुर्वे याने तिला घराबाहेर बोलाविले. त्यावर नकार दिला असता तुझ्या वडिलांना सोडणार नाही. तुझे वडील कोठे कामाला जातात, ते माहित असल्याची धमकी त्याने तिला दिली. त्यामुळे आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी दुपारी २ नंतर ती गेली. तेथे उभ्या असलेल्या एका कारमध्ये बसण्यास आरोपीने तिला सुचविले. त्यावर तिने नकार दिला असता त्याने पुन्हा तिच्या वडिलांना मारण्याची धमकी दिली. म्हणून ती त्या चारचाकीत वाहनात बसली. वाहनात त्याने जबरदस्तीने विनयभंग केला. नकार दिला असता त्याने तिला शिविगाळ केली.
म्हणाला, चल निघ!
तेवढ्यात तिचे वडिल येताना दिसल्याने त्याने घाबरुन चारचाकी प्रगती विद्यालयाजवळ घेतली. तेथे तिला उतरुन दिले. दरडावणीच्या सुरात चल निघ, असे म्हणत, वाच्यता केल्यास मला व वडिलांना मारून टाकेन, अशी धमकी त्याने दिल्याची तक्रार पिडिताने नोंदविली. आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेत तिने कसेबसे घर गाठले. संपुर्ण प्रकरण वडिलांच्या कानावर घातले. तथा काही वेळाने नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.