अमरावती - तुरीचे उभे पीक जळून खाक, शेतक-यावर आली उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 03:15 PM2017-11-15T15:15:43+5:302017-11-15T15:15:59+5:30
धामणगाव रेल्वे शेजारी असलेल्या शेतात आग लागल्यानं दीड एकारातील तूर जळून खाक झाली आहे. धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथे बुधवारी ही घटना घडली.
अमरावती - धामणगाव रेल्वे शेजारी असलेल्या शेतात आग लागल्यानं दीड एकारातील तूर जळून खाक झाली आहे. धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथे बुधवारी ही घटना घडली. जळगाव आर्वी येथील बिसन मोतीराम सहारे यांच्या मालकीची तीन एकर शेती आहे. दरवर्षी या शेतात ते तुरीचे पीक घेतात. यंदा दीड एकरात म्हाडा तुरीची पेरणी केली होती. दोन दिवस मजूर न मिळाल्याने ही तूर सोंगण्यात आली नाही.
आज बाजूच्या धुया-याला अचानक आग लागली या आगीने उग्र रूप धारण केले, शेतक-याने त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झाले नाही. यामुळे शेतातील पूर्ण तूर जळून खाक झाली.
माहिती मिळताच तलाठी गणेश ऊइके, कृषी सहाय्यक कविता राजेंद्र ठाकरे यांनी जळालेल्या तुरीचा पंचनामा केला. तूर आगीत भस्मसात झाल्याने या शेतक-यावर उपासमारीची वेळ आली आहे.