दुभत्या जनावरांना लागणार अमरावती 'टॉपर'चा 'टॅग'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 06:56 PM2017-08-19T18:56:18+5:302017-08-19T18:56:21+5:30

अमरावतीत जनावरांच्या ओळखीसाठी दुभत्या जनावरांनाही 'युनिक आयडेन्टी कोड' देण्यात येत असून त्यासाठी जनावरांना 'टॅग' लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

Amravati topper 'tag' for milch animals | दुभत्या जनावरांना लागणार अमरावती 'टॉपर'चा 'टॅग'

दुभत्या जनावरांना लागणार अमरावती 'टॉपर'चा 'टॅग'

Next

वैभव बाबरेकर/अमरावती, दि. 19 -प्रत्येक माणसाची ओळख पटण्यासाठी केंद्र शासनाने आधार नोंदणीचा उपक्रम राबविला. आता जनावरांच्या ओळखीसाठी दुभत्या जनावरांनाही 'युनिक आयडेन्टी कोड' देण्यात येत असून त्यासाठी जनावरांना 'टॅग' लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यात २४० जनावरांना आतापर्यंत 'टॅग' लावण्यात आले आहेत. यामध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.  

केंद्र शासनाने नागरिकांना आधार ओळखपत्र दिले त्यानुसार प्रत्येक नागरिकांच्या संपूर्ण माहितीचा डाटा तयार झाला आहे. त्याचप्रमाणे आता दुधाळ जनावरांपैकी गाय व म्हशी वर्गातील जनावरांनाही 'युनिक आयडेन्टी कोड' दिला जात आहे. जिल्ह्यात १६८ पशुवैद्यकीय चिकित्सालयातील प्रमुखांकडे गायी व म्हशींना 'टॅग' लावण्याचे काम सोपवण्यात आले असून टॅग लावलेल्या जनावरांची माहिती ऑनलाईन शासनाकडे पाठवावी लागत आहे. माहिती डाटा 'अपलोड' करण्यासाठी शासनाकडून पशुसंवर्धन विभागाला 'इनॉफ' साफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

शासनाकडून अमरावती जिल्ह्याला सद्यस्थितीत ५६ हजार टॅग उपलब्ध करून देण्यात आले असून जून महिन्यापासून पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत २४० जनावरांना टॅग लावले आहे. प्रत्येक जनावरांना टॅग लावलो जात असल्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील जनावरे दुभती आहेत व कोणत्या जनावरांची प्रजनन क्षमता सर्वाधिक आहे, ही माहिती शासनापर्यंत पोहोचणार आहे. त्यानुसार दुग्ध व्यवसायाची प्रगती निश्चित होण्याचे संकेत आहे. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे पशुधन विकास अधिकारी आर.एस.अलोने यांच्याकडे टॅगसंदर्भात जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 
कामाचा ताण वाढला
शासनाने नवा उपक्रम सुरू केला. मात्र, तेवढ्याच मनुष्यबळाला नियमित कामे करून 'टॅग' लावण्याचे काम करावे लागत आहे. जनावर पालकांना भेटून 'टॅग' लावण्याचे हे अतिरिक्त काम वाढल्यामुळे अधिकारी व कर्मचा-यांवर ताण वाढला आहे. टॅग लावल्यानंतर संपूर्ण माहिती ऑनलाइन 'अपलोड' करावी लागत आहे. मात्र, शासनाकडून डाटा एन्ट्री ऑपरेटर देण्यात आला नाही. 
जिल्हानिहाय आकडेवारी
अमरावती - २४०
औरंगाबाद- २३७
अकोला- ४५
सांगली - १७
पुणे - ४ 
सातारा- ८
रायगड-२
रत्नागिरी-६
माणसाच्या ओळखीसाठी आधार क्रमांक आहे. त्याचप्रमाणे दूध देणा-या जनावरांनाही युनिक आयडेन्टी कोड देण्यात येत आहे. त्यासाठी गाय व म्हशी वर्गातील जनावरांना टॅग लावून त्यांची संपूर्ण माहिती शासनाला पाठविली जात आहे. यात अमरावती जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.  - मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
 

Web Title: Amravati topper 'tag' for milch animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.