अमरावतीचा व्यापारी ठरला ‘नायजेरियन फ्रॉड’चा बळी

By admin | Published: May 22, 2017 12:32 AM2017-05-22T00:32:15+5:302017-05-22T00:32:15+5:30

सोशल मिडियावरून परिचय झाल्यानंतर पुरेपूर विश्वास संपादन केल्यानंतर शहरातील एका कपडा

Amravati trader became the victim of 'Nigerian Fraud' | अमरावतीचा व्यापारी ठरला ‘नायजेरियन फ्रॉड’चा बळी

अमरावतीचा व्यापारी ठरला ‘नायजेरियन फ्रॉड’चा बळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोशल मिडियावरून परिचय झाल्यानंतर पुरेपूर विश्वास संपादन केल्यानंतर शहरातील एका कपडा व्यापाऱ्याला ‘नायजेरियन फ्रॉड’मध्ये अडकविण्यात आले. कॅन्सरवर काम करणाऱ्या औषधी खरेदी व्यवहाराची बतावणी करून आरोपींनी या व्यापाऱ्याची तब्बल ६६ लाख ९९ हजार ४०० रूपयांनी फसवणूक केली.
विष्णूनगरातील रहिवासी कैलास शिवप्रसाद तिवारी (५९) यांची फेसबुकवर तीन महिन्यांपूर्वी एका महिलेशी ओळख झाली होती. दोघांमध्ये ‘चॅटिंग’ सुरु झाल्यानंतर महिलेने कैलास यांना युकेमधील एका कंपनीत काम करीत असल्याचे सांगितले होते. आमची कंपनी कॅन्सर व एड्स या रोगाच्या औषधींचे उत्पादन करीत असल्याचे महिलेने कैलास यांना सांगितले. त्यानंतर या महिलेने कैलास यांना ‘ई-मेल’ आयडी देऊन पुढील संवाद सुरूच ठेवला. औषधी निर्मितीसाठी उपरोक्त कंपनी जपान येथून अकीकबरा सीड्सचा कच्चा माल बोलाविते. तो कच्चा माल कंपनीला खरेदी करून दिल्यास कमिशन मिळू शकते, असे या महिलेने तिवारी यांना सांगितले. या औषधीचा कच्चा माल बोलावून आम्हाला दिल्यास ७० टक्के कमिशन देऊ व उर्वरित ३० टक्के आम्ही ठेऊ, असे त्या महिलेने महिलेने तिवारींच्या ‘ई-मेल’वर कळविले. जपान येथील एका मित्राशी संपर्क करून ्रकळवित असल्याचे महिलेने कैलास यांना सांगितले होते. दरम्यान औषधी बनविण्याचा कच्चामाल भारतात सुद्धा उपलब्ध आहे. तो खरेदी करून आम्हाला द्या, असे महिलेने कैलास यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी महिलेने दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात केली. महिलेने दिलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यात कैलास यांनी १ लाख ६३ हजारांच्या रोखीचा भरणा केला. काही दिवसांत एक व्यक्ती कैलास यांच्या घरी आला आणि त्याने औषधी तयार करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या काही बिया सुद्धा कैलास यांना दाखविल्या.

महिलेचा पत्ता बनावट
अकीकबरा सीडसचा अधिक माल लागणार असल्याची बतावणी केल्याने आरटीजीएसद्वारे कैलास तिवारींनी बँक खात्यात ६६ लाख ९९ हजार ४०० रूपयांचा भरणा केला. मात्र, काही दिवसानंतर तिवारी यांनी महिलेने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता तो पत्ता अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. फसवणूक झाल्याचे कळताच कैलास यांनी शनिवारी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली. आदिश शर्मा, डॉ. कॉसमास व महिलेविरूद्ध कलम ४२०, ४६८ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Amravati trader became the victim of 'Nigerian Fraud'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.