अमरावती विद्यापीठ; पीएचडी प्रबंधासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:55 AM2020-07-01T11:55:50+5:302020-07-01T11:57:41+5:30

कुलगुरूंनी पीएचडी प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिने मुदतवाढ दिली आहे. हा महत्वपूर्ण निर्णय असून, नव संशोधकांसाठी दिलासा देणारा आहे.

Amravati University; Six-month extension for PhD dissertation | अमरावती विद्यापीठ; पीएचडी प्रबंधासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ

अमरावती विद्यापीठ; पीएचडी प्रबंधासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ

googlenewsNext
ठळक मुद्देनवसंशोधकांना दिलासा१५ जुलैपर्यंत डेडलाईनची भिती दूर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पीएचडी प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नव संशोधक असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मानला जात आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबत आदेश निर्गमित केले आहे.
लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. त्यामुळे १५ जुलैपर्यंत पीएचडी प्रबंध सादर करण्याची अंतिम तारीख असणाऱ्या नव संशोधकांपुढे मोठे आव्हान होते. तसेच लॉकडाऊनमुळे पीएचडीसाठी नोंदणी न करू शकलेल्यांना प्रबंध सादर करून नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना पाच वर्षात कधीही पीएचडी पूर्ण करता येते. दरम्यान १५ जुलैपर्यत प्रबंध सादर करण्यासाठी सुमारे ५०० नव संशोधकांनी नोंदणी केली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे प्रबंध सादर करता आले नाही. या निर्णयामुळे नव संशोधकांना मोठा दिलासा मानला जात आहे.

कुलगुरूंनी पीएचडी प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिने मुदतवाढ दिली आहे. हा महत्वपूर्ण निर्णय असून, नव संशोधकांसाठी दिलासा देणारा आहे. १५ जुलैपासून मुदतवाढ ग्राह्य समजली जाणार आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

Web Title: Amravati University; Six-month extension for PhD dissertation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.