अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन; कॅन्सरशी झुंज संपली

By गणेश वासनिक | Published: January 28, 2023 09:55 AM2023-01-28T09:55:04+5:302023-01-28T09:55:10+5:30

कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले

Amravati University Vice Chancellor Dr. Dilip Malkhede passed away; The battle with cancer is over | अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन; कॅन्सरशी झुंज संपली

अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन; कॅन्सरशी झुंज संपली

googlenewsNext

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे शनिवारी पहाटे पुणे येथे निधन झाले. ते वर्षभरापासून कॅन्सर या आजाराशी लढा देत होते.

कुलगुरू म्हणून डॉ. मालखेडे यांनी   ११ सप्टेंबर २०२१ रोजी अमरावती विद्यापीठाची सूत्रे सांभाळली होती. डॉ. दिलीप मालखेडे पुणे येथील शासकीय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक होते. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली होती.

डॉ. मालखेडे हे  दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार -१ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत होते. मालखेडे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेतून पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे  (एमई) शिक्षण घेतले. मुंबई आयआयटी मधून त्यांनी संशोधन कार्य करीत पीएचडी प्राप्त केली होती. 

कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठे यांच्यासोबत करार केला होता. नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकता यावे याकरिता त्यांनी अमरावती विद्यापीठात सर्व विषयांसाठी क्रेडिट बेस्ट चॉईस सिस्टीम सुद्धा लागू केली होती. 
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा आप्त परिवार आहे.

Web Title: Amravati University Vice Chancellor Dr. Dilip Malkhede passed away; The battle with cancer is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.