अमरावतीत कर्जमाफीच्या याद्या अपलोड, प्रसिद्धीची प्रतीक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 04:36 PM2017-11-13T16:36:05+5:302017-11-13T16:36:33+5:30

आयटी विभागाच्या नव्या सॉफ्टवेअरनुसार जिल्ह्यातील कर्जदार एक लाख चार हजार शेतक-यांच्या याद्या पडताळणीनंतर अपलोड करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

Amravati uploads debt waiver lists, waiting for publicity | अमरावतीत कर्जमाफीच्या याद्या अपलोड, प्रसिद्धीची प्रतीक्षा कायम

अमरावतीत कर्जमाफीच्या याद्या अपलोड, प्रसिद्धीची प्रतीक्षा कायम

Next

गजानन मोहोड/अमरावती- आयटी विभागाच्या नव्या सॉफ्टवेअरनुसार जिल्ह्यातील कर्जदार एक लाख चार हजार शेतक-यांच्या याद्या पडताळणीनंतर अपलोड करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे शेतक-यांना तात्पुरत्या पात्र स्वरूपातील याद्या प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील ७४९ सोसायटी व बँक शाखांच्या याद्या अपलोड करताना सहकार विभागाची चांगलीच दमछाक झाली आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या नावाच्या याद्या अपडेशनचे काम सहकार विभाग व जिल्हा बँकेद्वारा युद्धपातळीवर सुरू होते. यामध्ये शासन निकषानुसार पहिल्या टप्प्यात बँकांचे थकबाकीदार शेतक-यांमधून निकषपात्र लाभार्थी, दुस-या टप्प्यात पडताळणी करून निकषपात्र लाभार्थ्यांची यादी अपलोड करणे, तर तिस-या टप्प्यात सहकारी संस्थांसह इतर पदाधिकारी वगळून त्यांची नावे अपात्रतेच्या यादीत समाविष्ट करणे आदी प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती. जिल्हा उपनिबंधकांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ६६९ सेवा सहकारी सोसायटीज व जिल्हा बँकेच्या ८० शाखा अशा एकूण ७४९ संस्थांच्या पात्र एक लाख चार हजार २१८ लाभार्थ्यांच्या याद्या शनिवारी उशिरापर्यंत शासनाच्या आयटी विभागाकडे अपलोड करण्यात आल्या आहेत. 

राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्या त्या- त्या शाखांच्या मुख्य कार्यालयाद्वारा अपलोड करण्याची प्रक्रिया अखेरच्या चरणार आहे. याची एकीकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, सहकार विभागाची प्रक्रिया आटोपली असून व्यापारी बँकांची प्रक्रिया एक वा दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर एका आठवड्याच्या अवधीत तात्पुरत्या पात्र शेतक-यांची यादी आयटी विभागाद्वारा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गावनिहाय याद्या अपलोड करून सहकार विभाग व तालुकास्तरीय समिती या यादीची पडताळणी करणार आहे. शासनाच्या या घोळात शेतक-यांना मात्र नाहक प्रतीक्ष करावी लागत आहे.

कर्जमाफीच्या प्रमाणपत्रानंतरही रक्कम जमा नाही
शासनाने दिवाळीच्या आदल्या दिवसी जिल्ह्यातील ३२ शेतक-यांना जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांचे हस्ते व एका शेतकºयाला मुंबईला मुख्यमंत्र्याचे हस्ते गौरविण्यात आले व त्यांना कर्जमाफ झाल्याविषयीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र प्रसिद्ध २३६ लाभार्थ्यांच्या हिरव्या यादीत त्यांचे नाव नसल्यामुळे त्यांचे कर्ज अद्यापही माफ झालेले नाहीत. त्या यादीतील ग्रामीण बँकेच्या शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी ४१ लाखांचा निधी जमा झालेला आहे. मात्र जिल्हा बँकेच्या खातेदारांच्या कर्जखात्यात पैसे मात्र अद्यापही जमा झाले नसल्यामुळे त्यांची कर्जमाफी झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या ८० शाखा व ६६९ सेवा सहकारी सोसायटींच्या एक लाख चार हजार २१८ शेतक-यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या पात्र शेतक-यांच्या यादीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर तालुका समिती पडताळणी करेल.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक
 

Web Title: Amravati uploads debt waiver lists, waiting for publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी