जैश-ए-मोहम्मदशी संपर्कात असल्याच्या संशयावरून अमरावतीच्या तरुणाला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:29 IST2024-12-12T18:28:05+5:302024-12-12T18:29:22+5:30

Amravati : अमरावती, संभाजी नगर आणि भिवंडीत एनआयएची छापेमारी

Amravati Youth Arrested by National Investigation Agency on Suspicion of Jaish-e-Mohammed Links | जैश-ए-मोहम्मदशी संपर्कात असल्याच्या संशयावरून अमरावतीच्या तरुणाला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक

Amravati Youth Arrested by National Investigation Agency on Suspicion of Jaish-e-Mohammed Links

अमरावती : अमरावतीच्या छाया नगर परिसरात छापेमारी करून २६ वर्षीय तरुण मोहम्मद युनूस शेख याला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आली. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा पाकिस्तानच्या दहशदवादी संघटनेशी त्याचे संबंध असल्याच्या संशयावरून चौकशी करत आहे. 

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून १९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात अमरावती, संभाजी नगर आणि भिवंडीतील तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पाकिस्तानची दहशदवादी यंत्रणा जैश - ए- मोहम्मद या संस्थेशी त्यांचे संबंध असल्याच्या संशयावरून या तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे तरुण जैश - ए- मोहम्मद या दहशदवादी संघटनेशी संपर्कात असल्याची माहिती आहे. 

देशात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि जम्मू आणि कश्मीर  केंद्रशासित प्रदेशात देखील छापेमारी करण्यात आली. तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा आणि भारतात दहशत पसरवण्याचा जैश - ए- मोहम्मद संघटनेचा कट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Amravati Youth Arrested by National Investigation Agency on Suspicion of Jaish-e-Mohammed Links

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.