Amravati | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर,अनेक प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 05:09 PM2022-07-29T17:09:22+5:302022-07-29T17:30:46+5:30

६६ पैकी ३३ जागांवर महिलाराज

Amravati | Zilla Parishad's announcement of leaving reservation, shocked to many elders | Amravati | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर,अनेक प्रस्थापितांना धक्का

Amravati | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर,अनेक प्रस्थापितांना धक्का

googlenewsNext

अमरावती : जिल्हा परिषद सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात आला असून यात ६६ जागांपैकी ३३ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. या आरक्षण सोडतीत अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागाच्या ६६ गटांसाठी ही आरक्षण सोडत नियोजन भवन येथे काढण्यात आली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, निवडणूक शाखेचे प्रमोद देशमुख विविध गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. प्रारंभी गावांची नावे नमूद असलेली प्रत्येक चिठ्ठी उपस्थितांना दर्शवून नंतर पारदर्शी डब्यात सर्वांसमोर त्याची सरमिसळ करुन जयेश संदीप गायधने व रुचल मिलिंद गायधने या बालकांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानंतर संबंधित गावाचे नाव जाहीर करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या सदस्य पदासाठी चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, अमरावती, अचलपूर, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकुली, चांदूररेल्वे, धामगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर अशा १४ तालुक्यांतील ६६ जागांसाठी सोडत करण्यात आली. ६६ जागांपैकी महिलांना ३३ जागा राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जाती १२ पैकी महिला ६, अनुसूचित जमाती १३ पैकी महिला ७, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) ७ पैकी महिला ४, सर्वसाधारण ३४ पैकी महिला १६ अशा जागांची सोडत निघाली. निवडणूक शाखेचे अधिकारी तसेच महसूल सहायक अनुपम उईके आदींनी सोडत प्रक्रिया राबविण्यासाठी साहाय्य केले.

असे आहे प्रवर्गनिहाय आरक्षण

अनुसूचित जाती आरक्षण

हतरू (चिखलदरा), शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी, करजगाव (चांदूर बाजार), बेनोडा (वरूड), कुऱ्हा (तिवसा) आदी गट महिलांसाठी राखीव आहेत. तर सलोना (चिखलदरा),सोनोरी (चांदूर बाजार), राजूरवाडी, अंबाडा (मोर्शी), शहापूर (वरूड), मंगरूळ दस्तगीर (धामणगाव रेल्वे)

अनुसूचित जमाती आरक्षण

रिध्दपूर, नेरपिंगळाई (मोर्शी),राजूरा बाजार (वरूड),तळेगाव ठाकूर (तिवसा),असदपूर (अचलपूर)जुना धामणगाव (रेल्वे), वऱ्हा (तिवसा) आदी गट महिलासाठी तर लोणी (नांदगाव खंडेश्वर),पळसखेड,घुईखेड (चांदूर रेल्वे),खानमपूर पांढरी,कापुसतळणी (अंजनगाव सुजी),जरूड (वरूड)

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)

लोणी (वरूड), दिया (धारणी), अंजनगाव बारी (अमरावती), तळेगाव दशासर आदी चार गट महिलांसाठी राखीव आहेत, तर पुसला (वरूड), वाठोडा शुक्लेश्वर (भातकुली), वलगाव (अमरावती)

सर्वसाधारण

टेंब्रुसोंडा (चिखलदरा), शिरजगाव बंड, कुऱ्हा, आसेगाव (चांदूर बाजार), शिराळा (अमरावती), कांडली (अचलपूर), सातेगाव (अंजनगाव सुजी), माहुली धांडे, शिंगणापूर, थिलोरी, पिंपळोद (दर्यापूर), पूर्णानगर, खोलापूर (भातकुली), देवगाव (धामनगाव रेल्वे), मंगरूळ चव्हाळा, वाढोणा रामनाथ (नांदगाव खंडेश्र्वर), आदी महिलांसाठी गट राखीव आहेत; तर प्रथ्रोट, शिंदी बु, धामनगाव गढी (अचलपूर), विहिगाव (अंजगाव सुजी), कुटंगा, गोंडवाडी, माेगर्दा, सावलीखेडा, घुटी (धारणी), पुसदा, नांदगाव पेठ (अमरावती), येवदा (दर्यापूर), निंभा (भातकुली), आमला विश्र्वेश्वर (चांदूर रेल्वे), फुबगाव (नांदगाव खंडेश्र्वर), हिवरखेड (मोर्शी), चिखली (चिखलदरा), धामनगाव गढी (अचलपूर).

११ पंचायत समितीसह धारणी, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव

जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे वगळता उर्वरित ११ तालुक्यातील पंचायत निवडणुकीसाठी जातीनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. धारणी नगरपंचायत तर धामणगाव रेल्वे नगरपरिषदेचेही आरक्षण जाहीर झाले आहे.

Web Title: Amravati | Zilla Parishad's announcement of leaving reservation, shocked to many elders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.