यशवंत पंचायत राजमध्ये राज्यात अमरावती झेडपी तृतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:31 PM2018-10-11T21:31:48+5:302018-10-11T21:32:11+5:30

सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या यशवंत पंचायतराज अभियानचा निकाल १० आॅक्टोबर रोजी जाहीर झाला. यात अमरावती जिल्हा परिषद राज्यात तृतीय, तर अचलपूर पंचायत समिती प्रथम व चांदूर रेल्वे पंचायत समिती व्दितीय आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीने विभागात तृतीय क्रमांक पटकाविला.

Amravati ZP III in the state of Yashwant Panchayat Raj | यशवंत पंचायत राजमध्ये राज्यात अमरावती झेडपी तृतीय

यशवंत पंचायत राजमध्ये राज्यात अमरावती झेडपी तृतीय

Next
ठळक मुद्देपुरस्कार घोषित : विभागात अचलपूर प्रथम, चांदूर रेल्वे पंचायत समिती द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या यशवंत पंचायतराज अभियानचा निकाल १० आॅक्टोबर रोजी जाहीर झाला. यात अमरावती जिल्हा परिषद राज्यात तृतीय, तर अचलपूर पंचायत समिती प्रथम व चांदूर रेल्वे पंचायत समिती व्दितीय आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीने विभागात तृतीय क्रमांक पटकाविला.
पंचायतराज संस्थांचे व्यवस्थापन व विकासकार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत फेब्रुवारीमध्ये जिल्हा पातळीवरची, तर मार्चमध्ये विभागीय पातळीवर तपासणी करण्यात आली. एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय समितीने जिल्हा परिषद व पंचायत समितीची पाहणी केली. जिल्हा परिषदेने २०१६-१७ या वर्षातील कामांची तपासणी केली. या कालावधीतील सामान्य प्रशासन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, स्वच्छ भारत अभियान यांचा समावेश होता. २०१६-१७ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत झालेले संगणकीकरण, जिल्हा परिषदेत मिळालेले विशेष पुरस्कार याबाबत माहिती घेण्यात आली.
जिल्हा परिषद स्वच्छ भारत अभियानात केलेले कार्यासोबतच तत्कालीन सीईओ किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके व त्यांच्या सहकारी अधिकाºयांनी राबविलेले क्लिन मेळघाट, ड्रिम मेळघाट हा नावीन्य उपक्रम व संगणकीय कामकाजासाठी केलेले कार्य या पुरस्कारासाठी यशस्वी ठरले. विशेष म्हणजे पूर्वीच्या पदाधिकाºयांनी आणि अधिकाºयांनी राबविलेल्या योजनांचा जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे व त्यांच्या सहकारी पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनीही कामांना गती दिली. सोबतच नवनवे उपक्रम राबवून याकडे लक्ष दिले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या, पंतप्रधान आवास योजना, दिव्यांग अभियान, स्वच्छता अभियान यासारख्या योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. यासर्व नावीन्यपूर्ण उपक्रमांची फलश्रृती म्हणून जिल्हा परिषदेने यशवंत पंचायतराज अभियानात राज्यातून तृतीय क्रमांक पटकाविला. जिल्हा परिषदेला हा पुरस्कार येत्या २६ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांचे हस्ते प्रदान केला जाईल.

अचलपूर, चांदूर रेल्वे पंचायत समित्यांची बाजी
यशवंत पंचायत राज अभियानात विभागात अचलपूर पंचायत समिती प्रथम, तर चांदूर रेल्वे आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समिती तृतीय पुरस्कारासाठी पात्र ठरली आहे.

राज्य शासनाच्या सर्वात मोठा असलेल्या यशवंत पंचायतराज अभियानाच्या या पुरस्काराने जिल्हा परिषदेची मान उंचावली आहे. हा सन्मान म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा गौरव होय.
- नितीन गोंडाणे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद

उल्लेखनिय कामगिरीमुळे पंचायतराज अभियानात तृतीय क्रमांक मिळाला. झेडपीतील नाविण्यपूर्ण उपक्रमाची ही फलश्रूती आहे. यापुढे राज्यात अव्वल स्थान मिळविण्यास समन्वयातून काम करू
- मनीषा खत्री,सीईओ जि.प.

Web Title: Amravati ZP III in the state of Yashwant Panchayat Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.