मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण धडक, क्रिकेट खेळायला निघालेल्या ४ तरुणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

By प्रदीप भाकरे | Published: February 18, 2024 11:08 AM2024-02-18T11:08:30+5:302024-02-18T11:21:11+5:30

Amravati Accident News: अमरावती येथील १४ तरुण यवतमाळला क्रिकेट खेळायला निघालेल्या तरुणांच्या मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण धडक झाली. सकाळी ७.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातात ४ तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जखमी झाले आहे.

Amravati:A terrible collision between a mini bus and a cement mixer truck, 4 youths who were going to play cricket died, 10 were seriously injured | मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण धडक, क्रिकेट खेळायला निघालेल्या ४ तरुणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण धडक, क्रिकेट खेळायला निघालेल्या ४ तरुणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

अमरावती - येथील १४ तरुण यवतमाळला क्रिकेट खेळायला निघालेल्या तरुणांच्या मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण धडक झाली.सकाळी ७.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातात ४ तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जखमी झाले आहे. गंभीर झालेल्यांना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर जवळ सिमेंट काँक्रिट मिक्सर आणि मिनी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत.. यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे  १४ तरुण अमरावतीहून यवतमाळसाठी सकाळी निघाले होते. मात्र वाटेतच नांदगाव खंडेश्वरच्या शिंगणापूरजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये ४ तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जमखी झाले आहे.. अपघातातील जखमी तरुणांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.. अमरावती शहरातील रिम्स हॉस्पिटल मध्ये आता या सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

Web Title: Amravati:A terrible collision between a mini bus and a cement mixer truck, 4 youths who were going to play cricket died, 10 were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.