लोकमतच्या ‘धम्माल गल्ली’त अमरावतीकरांची धम्माल!

By admin | Published: April 13, 2015 01:25 AM2015-04-13T01:25:45+5:302015-04-13T01:25:45+5:30

कुठलीही स्पर्धा नाही.. जय-पराजयाचे भय नाही.. कुणाला हरविण्याचे ध्येय नाही वा जिंकण्याची उर्मी नाही.. होता तो

Amravatikar's fame in Lokmant's 'Dhamal Galli' | लोकमतच्या ‘धम्माल गल्ली’त अमरावतीकरांची धम्माल!

लोकमतच्या ‘धम्माल गल्ली’त अमरावतीकरांची धम्माल!

Next

आबालवृध्द रमले : कार्यक्रमांची रेलचेल, तुफान गर्दी
अमरावती :
कुठलीही स्पर्धा नाही.. जय-पराजयाचे भय नाही.. कुणाला हरविण्याचे ध्येय नाही वा जिंकण्याची उर्मी नाही.. होता तो केवळ स्वच्छ, नितळ उन्माद.. आनंद आणि उत्साह.. धकाधकीच्या जीवनातून चार निवांत, आनंदाचे, हसरे क्षण वेचता यावेत म्हणून अमरावतीकर आबालवृध्द रविवारी पहाटेच इर्विन चौक ते गर्ल्स हायस्कूल मार्गावर जमले होते. निमित्त होते ‘लोकमत’च्या ‘धम्माल गल्ली’चे. या ‘धम्माल गल्ली’त अमरावतीकरांनी अक्षरश: ‘धम्माल’ केली. एरवी वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, वर्दळ अनुभवणाऱ्या इर्विन ते गर्ल्स हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यालासुध्दा रविवार १२ एप्रिलची पहाट सदैव स्मरणात राहील.
‘धम्माल गल्ली’ ही संकल्पना तशी नवखीच. दररोज तीच ती दगदग, तीच ती रटाळ दिनचर्या. या दिनचर्येला फाटा देत काही तरी वेगळे, अगदी मनाला वाटते तस्से..कितीही वागावेसे, करावेसे वाटले तरी ते साध्य होत नाही.

यांचीही उपस्थिती
‘लोकमत’च्या या आगळ्या उपक्रमात जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापौर चरणजितकौर नंदा, क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन भय्यासाहेब देशमुख, सिपना अभियांत्रिकीचे रवि रोडकर, भारतीय जैन संघटनेचे महेंद्र भंसाली, एडीफी स्कूलचे संचालक अतुल गायगोले, सायकल असो.चे अध्यक्ष विजय गुल्हाने आदींनी सहभाग नोंदविला.

Web Title: Amravatikar's fame in Lokmant's 'Dhamal Galli'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.