राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत अमरावतीच्या अनुज सारवानला सुवर्णपदक
By गणेश वासनिक | Published: June 17, 2023 02:01 PM2023-06-17T14:01:04+5:302023-06-17T14:01:25+5:30
ग्रीको रोमन प्रकारातील पदकाने सन्मानित, श्री ह.व्या.प्र मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमरावती : दिल्ली येथे ५ ते ७ जून २०२३ रोजी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा उत्कृष्ठ पैलवान अनुज शामु सारवान याने १९ वर्षाखालील ६३ किलो ग्रीको रोमन प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील शालेय कुस्तीगीर यांनी सहभाग घेतला होता. अनुजचे यश हे अमरावती जिल्हा व विदर्भसाहित राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
अनुज ला कुस्तीच्या उच्च प्रशिक्षणासाठी वारजे पुणे येथील सह्याद्री क्रीडा संकुल मध्ये प्रशिक्षणासाठी मंडळाचे प्रा. संजय तिरथकर यांनी पाठवले होते. सह्याद्री क्रीडा संकुल चे संचालक विजय बराटे व प्रशिक्षक संदीप पठारे यांचे अमूल्य मार्गदर्शन अनुजला मिळाले. राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धाकरिता अनुज ला पाठवण्यात आले. त्याने हरियाणा, कर्नाटक, यु.पी, व अंतीम फेरीत दिल्ली येथील स्पर्धकांना हरवुन सुवर्ण पदक प्राप्त केले. याआधी सुध्दा अनुज याने महाराष्ट्र स्तरावर अनेक पदके प्राप्त केले आहें.
त्याच्या या कामगिरीमुळे श्री ह. व्या. प्र. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव प्रा. डॉ माधुरी चेंडके, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, डॉ. संजय तिरथकर, ॲड प्रशांत देशपांडे, प्रा. रवींद्र खांडेकर, शामू सारवान आदींनी त पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.