अमरावतीच्या मुलीचे आग्य्रातून अपहरण, मावशीच्या सुनेविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:05 PM2019-07-08T23:05:22+5:302019-07-08T23:05:54+5:30
दोन महिन्यांची असताना आई मुलीला सोडून गेली. १५ वर्षांनंतर मावशीच्या सुनेने त्या मुलीला आग्रा येथे नेऊन आईशी भेट घालून दिली. दरम्यानच त्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार पुढे आला. मुलीच्या शोधात असणाऱ्या वडिलांनी राजापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र, तेथील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दोन महिन्यांची असताना आई मुलीला सोडून गेली. १५ वर्षांनंतर मावशीच्या सुनेने त्या मुलीला आग्रा येथे नेऊन आईशी भेट घालून दिली. दरम्यानच त्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार पुढे आला. मुलीच्या शोधात असणाऱ्या वडिलांनी राजापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र, तेथील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. त्यामुळे अखेर वडिलांनी सोमवारी पोलीस उपायुक्तांकडे दाद मागितली. त्यांनी राजापेठ पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी अपहरणाचा गुन्हा नोंदविला.
सिद्धार्थनगरातील रहिवासी एका ५० वर्षीय व्यक्तीची मुलगी दोन महिन्यांची असताना तिची आई सोडून गेली. आईने आग्रा येथील एका इसमाशी संसार थाटला. दरम्यान मुलीचे वडील बेलपुºयात भाड्याच्या खोली करून चौकीदाराची नोकरी करू लागले. बेलपुºयातच मुलीची मोठी मावशी राहत होती. आॅक्टोबर २०१८ मध्ये एके दिवशी मावशीची सून मुलीच्या घरी आली. आईची भेट करून देण्याचे सांगून तिने मुलीला आग्रा येथे नेले. त्यानंतर मावशीची सून तेथून परत अमरावतीत आली. दरम्यान दोन ते तीन महिने ती मुलगी आग्रा येथे आईकडे राहिली. त्यानंतर मावशीच्या सुनेने मुलीला आग्ºयाहून परत अमरावतीत आणले. १० जून रोजी मावशीच्या कोणालाही न सांगता त्या मुलीला पुन्हा आग्रा येथे नेले व तेथेच सोडून सून अमरावतीत परतली. दरम्यान मुलगी घरात नसल्याचे पाहून वडिलांनी शोधाशोध सुरू केली. त्यांनी मुलीबद्दल नातेवाईकांकडे चौकशी केली. राजापेठ पोलिसात तक्रार देण्यास गेले. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही. त्यांनी मावशीच्या सुनेला चौकशीकरिता बोलाविले होते. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आग्रा येथील नातेवाईकांशी संपर्क साधला. मुलीच्या आईच्या दुसºया पतीसोबत संपर्क साधून मुलीबाबत विचारणा केली. त्यावेळी धक्कादायक बाब पुढे आली. मुलगी तेथूनही बेपत्ता असल्याचे वडिलांना कळले. १५ जून २०१९ रोजी ती मुलगी आग्राहून बेपत्ता झाली. तिने रात्रीच्या वेळी घराचे दार बाहेरून बंद करून पलायन केले. यासंदर्भात आग्रा पोलिसांत तक्रार नोंदविल्याची माहिती तिच्या आईच्या दुसºया पतीने पोलिसांनाही दिली. या घडलेल्या प्रकारसंदर्भात मुलीचे वडील व आत्याने सोमवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यांनीही आग्रा येथील त्या व्यक्तीशी संपर्क साधून माहिती घेतली. या घटनेच्या अनुषंगाने डीसीपी सोळंके यांनी राजापेठचे प्रभारी ठाणेदार दिलीप चव्हाण यांना अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे सूचित केले. त्यानुसार मुलीचे वडील राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले. याप्रकरणात पोलिसांनी भावना नामक मावशीच्या सुनेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.
भावना पतीसह पसार
मुलीच्या मावशीची सून बेलपुऱ्यातील रहिवासी ठिकाणावरून पसार झाली आहे. राजापेठ पोलीस तिचा शोध घेत आहेत. मुलीला आग्रा पोहोचून देण्यात व तेथून परत आणण्यात भावनाने पुढाकार घेतला होता. तिच्या या पुढाकाराचे गुपित काय आहे, हे भावनाला अटक केल्यानंतर पुढे येईल.