अमरावतीच्या आयएएस सुपूत्राचा लंडनमध्ये डंका; जबलपूर महापालिकेच्या कारभाराचे कौतुक

By गणेश वासनिक | Published: September 13, 2023 06:33 PM2023-09-13T18:33:41+5:302023-09-13T18:33:48+5:30

देशभरातून एकमात्र जबलपूर महानगरपालिकेची निवड झाली होती, हे विशेष. 

Amravati's IAS son dunked in London Appreciation of the administration of Jabalpur Municipal Corporation | अमरावतीच्या आयएएस सुपूत्राचा लंडनमध्ये डंका; जबलपूर महापालिकेच्या कारभाराचे कौतुक

अमरावतीच्या आयएएस सुपूत्राचा लंडनमध्ये डंका; जबलपूर महापालिकेच्या कारभाराचे कौतुक

googlenewsNext

अमरावती: अमरावती येथील आयएएस सुपूत्र असलेल्या स्वप्नील वानखडे यांनी जबलपूर महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत असताना राबविलेल्या विविध उपक्रमांची थेट ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ ने दखल घेतली आहे. वानखडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा लंडनमध्ये डंका वाजल्याने अंबानगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशभरातून एकमात्र जबलपूर महानगरपालिकेची निवड झाली होती, हे विशेष. 

जबलपूर शहरातील लहान मुले, महिला आणि वृद्धांना चांगले वातावरण देण्यासाठी प्रशिक्षणानंतर नगरसेवक परतले आहे. स्मार्ट अंगणवाडी, वाचनालय, उत्कृष्ट लसीकरण केंद्र आणि स्मार्ट संस्कारी लंडनपर्यंत बागांची चर्चा झाली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जबलपूर महापालिकेने संस्कारगृहातील लहान मुले, महिला आणि वृद्धांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या कार्याचे खूप कौतुक झाले आहे. जबलपूर महापालिकेचे आयुक्त स्वप्नील वानखडे यांच्यासह काही नगरसेवकांचा प्रशिक्षण दौरा नुकताच आटोपला. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रप्रताप गोहल, सहाय्यक आयुक्त संभाव अयाची यांनी प्रशिक्षणादरम्यान सविस्तर माहिती दिली.
 
लंडन येथे नुकतेच झालेल्या प्रशिक्षणात देशातील एकमेव जबलपूरला सहभागी होता आले. यादरम्यान, जबलपूरच्या कामगिरीची छायाचित्रे आणि तथ्ये यांच्या माध्यमातून विचार मांडण्यात आले. यात वाचनालय, स्मार्ट अंगणवाडी, लसीकरण केंद्र, बसेसमधील उद्यानांमध्ये लहान मुले, महिला व वृद्धांसाठी केलेली कामे सोयीच्या दृष्टिकोनातून अधिक लक्षणीय ठरली. आई-वडीलांच्या प्रेरणेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. - स्वप्नील वानखडे, आयुक्त जबलपूर महापालिका
 
जगभरातील टॉप टेनमध्ये जबलपूर
भारत, अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, आयर्लंड ९ देशांतील दहा शहरांनी भाग घेतला.जॉर्डन, पोलंड, ग्रीस, कोसोवा या देशांच्या नावांचा समावेश होता. टॉप १० शहरांमध्ये जबलपूरचे नाव निवडले गेले. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या नर्चरिंग अँड नेबरहुड चॅलेंज अंतर्गत जबलपूर स्मार्ट सिटीने शहरातील उद्याने, अंगणवाडी, आरोग्य उपचार केंद्र आदी ठिकाणी अनेक प्रकारची विकासकामे केली आहेत.

Web Title: Amravati's IAS son dunked in London Appreciation of the administration of Jabalpur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.