अमरावतीच्या जागृती क्रीडा मंडळाने मारली कबड्डीत बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:13 AM2021-09-03T04:13:42+5:302021-09-03T04:13:42+5:30
प्रहार कबड्डी लीग; विदर्भ स्तरीय स्पर्धा फोटो - कबड्डी ०२ पी चांदूर बाजार : प्रहार चषक व निर्मिती कबड्डी ...
प्रहार कबड्डी लीग;
विदर्भ स्तरीय स्पर्धा
फोटो - कबड्डी ०२ पी
चांदूर बाजार : प्रहार चषक व निर्मिती कबड्डी क्लब यांच्यातर्फे विदर्भास्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अमरावतीच्या जागृती क्रीडा मंडळाने प्रथम क्रमांक, ततर नांदगावपेठ येथील नेताजी क्रीडा मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला.
दरवर्षी प्रहार चषकतर्फे कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धांमध्ये विदर्भमधून टॉप १२ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उदघाटन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नागरवाडी आश्रमचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सचिव जितेंद्र ठाकूर, सहसचिव सतीश डफळे, गो.सी. टोम्पे महाविद्यालयाचे सचिव भास्कर टोम्पे, प्रहार तालुकाध्यक्ष संतोष किटुकले, प्राचार्य रामटेके व निर्मिती कबड्डी क्लबचे सचिव सुयोग गोरले उपस्थित होते.
विदर्भातून १२ संघ सहभागी झाले होते. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः कबड्डीच्या मैदानात एन्ट्री टाकत खेळाचा आनंद घेतला. त्यांनी मातीचा खेळात खेळाडूंनी पुढाकार घेण्यासाठी संपूर्ण मदत करण्याचे जाहीर केले. यामध्ये चेतन कडू, ऋषी पोहकार, राज निंभोरकर, साहिल भगत, मनीष दाभाडे, आदेश फुके, मंथन इंगळे, श्याम मांडले यांनी परिश्रम घेतले.