अमरावतीची नूपुर मुरके ज्युनिअर सायंटिस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:58 PM2019-03-11T22:58:48+5:302019-03-11T22:59:16+5:30

दी ग्रेटर मुंबई टीचर्स असोसिएशनद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक सायंस टॅलेंट सर्च स्पर्धेत अमरावतीच्या टोमोय स्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी नूपुर मुरके हिने सुवर्णपदक मिळविले. तिने कनिष्ठ शास्त्रज्ञाचा दर्जा प्राप्त करून अंबानगरीचा मान उंचावली आहे.

Amravati's Nupur Murke Junior Scientist | अमरावतीची नूपुर मुरके ज्युनिअर सायंटिस्ट

अमरावतीची नूपुर मुरके ज्युनिअर सायंटिस्ट

Next
ठळक मुद्देडॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा : राज्यातून ६१ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दी ग्रेटर मुंबई टीचर्स असोसिएशनद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक सायंस टॅलेंट सर्च स्पर्धेत अमरावतीच्या टोमोय स्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी नूपुर मुरके हिने सुवर्णपदक मिळविले. तिने कनिष्ठ शास्त्रज्ञाचा दर्जा प्राप्त करून अंबानगरीचा मान उंचावली आहे.
स्पर्धेत इयत्ता सहावी ते नववीच्या ६१ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. चार चरणात झालेल्या या स्पर्धेत केवळ ६४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, २७६ विद्यार्थ्यांना रौप्य व १७० विद्यार्थ्यांना कांस्यपदकाने गौरविण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना एका संशोधनावर काम करावे लागले. नूपुरने चार आश्रमशाळांमधील बुरशीजन्य आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांची आजारातून सुटका करण्यात मदत केली. शाळेत जाऊन तिने सहजसोपे उपाययोजनेसंदर्भात टिप्स दिल्या. या कार्याला परीक्षकांनी सर्वोत्तम गुण दिले. तिचा माटुंगा येथे रविवारी आयोजित सोहळ्यात वरिष्ठ वैज्ञानिक संतोष टकले यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: Amravati's Nupur Murke Junior Scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.