नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अमृतधारा बरसल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:21+5:302021-07-12T04:09:21+5:30
बेंबळा दुथडी भरून वाहिली, माहुली मंडळात ६२.८० मिमी पाऊस फोटो - नांदगाव खंडेश्वर पी ११ नांदगाव खंडेश्वर : ...
बेंबळा दुथडी भरून वाहिली, माहुली मंडळात ६२.८० मिमी पाऊस
फोटो - नांदगाव खंडेश्वर पी ११
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गेल्या दहा दिवसांपासून पावसाची दडी होती. पिक कोमेजल्यागत झाली होती. शिवारात अमृतधारा बरसल्याने असल्याने पिकाचे अंकुर टवटवीत होणार, हा आशेचा किरण खंडाळा परिसरातील शेतकऱ्यांना सुखावणारा ठरला आहे. तालुक्यात २४ तासांत माहुली चोर मंडळात ६२.८० मिमी, तर धानोरा गुरव मंडळात ५७.३० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे परिसरातील बेंबळा नदी दुथडी भरून वाहत होती.
रविवारी पहाटे ४ च्या सुमारास नांदगाव महसूल मंडळात ३१.५ मिमी, दाभा ८.८ मिमी, शिवणी रसुलापूर ५ मिमी, मंगरूळ चव्हाळा महसूल मंडळात निरंक, पापळ महसूल मंडळात २६.४५ मिमी, लोणी मंगळात १९.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजपावेतो तालुक्यात ३१८ मिमी एकूण पावसाची नोंद आहे. दरम्यान नांदगाव खंडेश्वर शहरानजीक लेंडी नाल्याच्या खाचाखोचा पाण्याने भरल्याने नाल्यालगतच्या खोलगट भागातील पिके पाण्याखाली आली आहेत.
तालुक्यात ८ जुलैपर्यंत ४५ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. ६ हजार ४६ हेक्टर क्षेत्रात कपाशी, ८ हजार ६१५ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी, ३४६ हेक्टर क्षेत्रात मूग व ३०० क्षेत्रात उडिदाची पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी ९५ टक्के क्षेत्रात पेरणी केल्याचे तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी सांगितले.
----------------
शिवरा, गोळेगाव, खानापूर, जगतपूर शिवारातही काल पहाटे पाऊस पडल्याने पिकाला जीवदान मिळाले. पावसाअभावी तणनाशक फवारणीचे काम खोळंबले होते, ते आता सुरू झाले.
- मनोहर बगळे, शेतकरी गोळेगाव.
-----------
खंडाळा परिसरात सुरुवातीला शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीवर जोराचा पाऊस पडला होता. त्यामुळे बियाणे दडपले होते. त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. नंतर दहा दिवस पावसाचा खंड होता. काल थोडाफार समाधानकारक पाऊस झाला. गतवर्षीच्या पीक विम्याची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावी.
- प्रमोद ठाकरे, शेतकरी, खंडाळा
------------
110721\img-20210711-wa0021.jpg
आज पहाटे पहूर येथील बेंबळा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत होते.